IPL Auction 2021 live streaming  क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.


यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये 292 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त 61 खेळाडूंनाच करारबद्ध केलं जाणार आहे. IPL 2021 मध्ये 1114 खेळाडूंनी स्वारस्य़ दाखवलं होतं. दरम्यान, या खेळाडूंपैकी 164 खेळाडू हे भारतीय आहेत. तर, परदेशी खेळाडूंचा आकडा 125 इतका आहे. 3 खेळाडू आयसीसीशी संलग्न राष्ट्रांतील असल्याचं कळत आहे.


IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...


IPL 2021 च्या लिलावासाठी बोली लावण्याचा सर्वाधिक आकडा 2 कोटी किमान किंमत ही 20 लाख रुपये इतकी आहे. किंमतीचे लाख आणि कोट्वधींच्या घरातील आकडे आणि त्यासाठी खेळाडूंवर लावली जाणारी बोली, नेमकी तुम्हाला कुठे आणि कशी पाहता येणार याची उत्तरं खालीलप्रमाणं...


-कधी आहे आयपीएलचा लिलाव?


गुरुवारी, 18 फेब्रुवारी 2021ला आयपीएलचा लिलाव आहे.


-कुठे पार पडणार आहे लिलाव?


यंदाच्या वर्षीचा लिलाव हा चेन्नईमध्ये पार पडणार आहे.


-किती वाजता सुरु होणार लिलाव?


भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजता या लिलावास सुरुवात होणार आहे.


-कुठे पाहता येणार लिलावाच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण?


Star Sports 1, Star Sports 3, Star Sports 1 HD, Star Sports 3 HD अशा वाहिन्यांवर हा लिलावाचा कार्यक्रम पाहता येणार आहे.


-कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाईव्ह पाहायचं झाल्यास काय कराव?


Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलच्या लिलाव कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.