CSK vs SRH IPL 2025 : MS धोनी आणि काव्या मारनसाठी आज सर्वकाही पणाला! चेन्नई आणि हैदराबादमध्ये जो हरणार तो थेट बाहेर, जाणून घ्या समीकरण
आयपीएल 2025 आता एका रोमांचक वळणावर पोहोचले आहे. प्लेऑफसाठीची लढाई आता रंजक बनली आहे.

Ipl 2025 Playoffs Qualification Scenario : आयपीएल 2025 आता एका रोमांचक वळणावर पोहोचले आहे. प्लेऑफसाठीची लढाई आता रंजक बनली आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करल्यामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नऊ संघांमध्ये लढाई सुरू आहे. पण, शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर दुसऱ्या संघ बाहेर होईल.
The Run Up to the game begins! 🦁🔜#CSKvSRH #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/YBnaCae8cv
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 25, 2025
राजस्थानचा संघ आतापासून प्रत्येक सामना जिंकला तरी जास्तीत जास्त 14 गुण होतील, तर सध्याच्या पॉइंट टेबलमध्ये असे सहा संघ आहेत जे 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचू शकतात. गुजरात टायटन्स, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सना 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी फक्त दोन विजयांची आवश्यकता आहे.
Prediction time 💭
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Who do you think will make it to the playoffs? ✍👇#TATAIPL pic.twitter.com/nCSmFYzUFo
मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांना प्रत्येकी तीन सामने जिंकावे लागतील. कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या उर्वरित सहा सामन्यांपैकी पाच विजयांसह 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. हैदराबाद आणि चेन्नईची परिस्थिती राजस्थानसारखीच आहे. आज पराभूत होणारा संघ जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. पण, विजेत्या संघासाठी दरवाजे खुले असतील.
Orange Army vs WhistlePodu Army at Chepauk Today #SRHvsCSK pic.twitter.com/z9lJrRRoOk
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) April 24, 2025
MS धोनी आणि काव्या मारनसाठी आज सर्वकाही पणाला!
चेन्नई आणि हैदराबाद या दोघांनाही उर्वरित सहा सामने जिंकावे लागतील. पण, आज यापैकी एकाचा दरवाजा बंद होईल. राजस्थान संघ शर्यतीतून बाहेर पडला आहे. आज चेपॉक येथे चेन्नई आणि हैदराबाद एकमेकांसमोर येतील आणि पराभूत संघाचा प्रवास संपेल. विजेत्या संघासाठीही पुढचा रस्ता सोपा नसेल, कारण खराब नेट रन रेट देखील अडचणीचे कारण बनू शकतो. सीएसकेचे आगामी सामने एसआरएच, पीबीकेएस, आरसीबी, केकेआर, आरआर आणि जीटी विरुद्ध आहेत. हैदराबादचे आगामी सामने सीएसके, जीटी, डीसी, केकेआर, आरसीबी आणि एलएसजी विरुद्ध आहेत.
The moment you've all been waiting for 🧡
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 16, 2025
Mark your calendars, #OrangeArmy! It's time to #PlayWithFire 🔥#TATAIPL2025 pic.twitter.com/FTXpFMqFCg
हे ही वाचा -





















