IPL 2025 Players Retention Live : विराट कोहलीला 21 कोटी तर ऋषभ पंतचे नाव गायब! रिटेन्शन लिस्ट पाहून सर्वांनाच बसणार धक्का
IPL 2025 Players Retention Announcement Live : 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत ऋषभ पंतचे नाव नाही. त्याने कायम ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 साठी केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी विराट कोहलीला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनी, गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे. धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
- पहिल्या खेळाडूची निवड - 18 कोटी
- दुसऱ्या खेळाडूची - 18 कोटी
- तिसऱ्या खेळाडूची निवड - 11 कोटी
- चौथ्या खेळाडूची निवड - 18 कोटी
- पाचव्या खेळाडूची निवड - 14 कोटी
- अनकॅप खेळाडू - 4 कोटी
पाच खेळाडूंना कायम ठेवल्यास एकूण - 75 कोटी
कोलकाता फ्रँचायझी आंद्रे रसेलला सोडू शकते. रसेल अनेक वर्षांपासून केकेआरसोबत आहे.
चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच फ्रँचायझी कायम ठेवण्याची यादी जाहीर करतील आणि खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होईल.
रोहित शर्माबद्दल बातमी अशी आहे की मुंबई इंडियन्स त्याला आयपीएल 2025 साठी कायम ठेवणार आहे. त्याच्यासह सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनाही कायम ठेवण्यात आले आहे. रोहितला कायम ठेवण्याचा एमआयचा निर्णय आणि रोहितचा हा निर्णय चाहत्यांना मान्य नाही.
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी अनेक बड्या खेळाडूंना सोडण्यात आल्याची बातमी आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा, आरसीबीचा मोहम्मद सिराज, कोलकाता नाईट रायडर्सचा श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेल आणि लखनऊ सुपर जायंट्सचा केएल राहुल यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनलाही सोडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व संघ त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील.
चेन्नई सुपर किंग्जच्या कायम ठेवण्याच्या यादीबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई संघातील रवींद्र जडेजाचे स्थान धोक्यात येऊ शकते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा - मोठी अपडेट; रवींद्र जडेजासोबत CSK ने केला मोठा गेम, MS धोनी अन् ऋषभ पंत एकाच संघात खेळणार?
आयपीएल 2025 रिटेंशनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दुपारी 4:30 वाजल्यापासून होईल. याशिवाय जिओ सिनेमावर लाइव्ह असेल. फ्रँचायझी कोणते खेळाडू कायम ठेवत आहे आणि कोणाला सोडत आहे हे यातूनच कळेल. सर्व 10 संघांनी 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बीसीसीआयकडे कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.
IPL 2025 Players Retention Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधारही बदलू शकतो. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनू शकतो, असे मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत.
कायम ठेवलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी समोर येण्यापूर्वीच अटकळ सुरू झाली आहे. विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मासह अनेक बड्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. सर्व 10 फ्रँचायझी कोणते खेळाडू कायम ठेवू शकतात ते जाणून घेऊया...
पार्श्वभूमी
IPL 2025 Players Retention Live Update : 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस असणार आहे. लवकरच सर्व फ्रँचायझी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारपर्यंत कायम ठेवण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे रिटेंशनशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी अपडेट फक्त एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -