Nitish Kumar Reddy अहमदाबाद : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू नितीश कुमार रेड्डी मॅचपूर्वी एका कारणामुळं चर्चेत आला आहे. नितीश कुमार रेड्डी याच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नितीश कुमार रेड्डी 2023 पासून सनरायजर्स हैदराबादकडून खेळतोय. मात्र, त्याच्या वडिलांनी आरसीबीची जर्सी घातल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं.
नितीशु कमार रेड्डीचे वडील मुत्याला रेड्डी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जर्सीमध्ये वर्कआऊट करत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी 2023 पासून सनरायजर्स हैदराबादसाठी खेळतोय. आयपीएलच्या 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला 6 कोटी रुपयांमध्ये हैदराबादनं रिटेन केलं होतं. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की नितीश कुमार रेड्डी एकीकडे सनरायजर्स हैदराबादकडून 6 कोटी घेतोय आणि त्याचे वडील आरसीबीची जर्सी घालून वर्कआऊट करतात. मुत्याला रेड्डी आरसीबीचे मोठे फॅन असावेत, अशी प्रतिक्रिया देखील समोर आली.
नितीश कुमार रेड्डी अन् हैदराबादची निराशाजनक कामगिरी
नितीश कुमार रेड्डीनं आयपीएलमध्ये 2023 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून पदार्पण केलं होतं. नितीशनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात 303 धावा केल्या आहेत. या हंगामात त्यानं 9 डावांमध्ये 152 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं एकही अर्धशतक केलेलं नाही.
सनरायजर्स हैदराबादनं गेल्या वर्षी 17 व्या हंगामात अंतिम फेरीत धडक दिली होती. यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सनंतर बाहेर स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे. आजची मॅच सनरायजर्स हैदराबादला जिंकण्याची आवश्यकता आहे. जर,गुजरात टायटन्स विरुद्ध हैदराबादचा पराभव झाला तर त्यांचा प्ले ऑफ मधील प्रवास संपेल.सनरायजर्स हैदराबाद 9 सामन्यांमध्ये केवळ 3 विजयांसह 9 व्या स्थानावर आहे.
गुजरातची आक्रमक सुरुवात
सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मात्र, शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सनं 6 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या. साई सुदर्शननं 45 धावा केल्या तर शुभमन गिलनं 36 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांची धुलाई केली.
इतर बातम्या :