नवी दिल्ली : भारत सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि सेलिब्रेटींच्या यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे. शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानी खेळाडूंना भारत सरकारनं आणखी दणका दिला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानी कलाकार हनिया अमीर आणि अली फैझल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. 

भारत सरकारनं पाकिस्तानचा ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू अर्शद नदीमच्या इन्स्टाग्राम खात्यावर बंदी घालण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26  जणांचा मृत्यू झाला होता. हा भ्याड दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला करण्यात एळा होता. 

भारत सरकारनं बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, अर्शद नदीम यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर बंदी घातली आहे. काही नेटकऱ्यांना या खेळाडूंच्या अकाऊंटवर भारतात हे अकाऊंट उपलब्ध नाही, असा मेसेज दिसत आहे. 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला हल्ला केला होता. या दहशतवादी  हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 6 जण महाराष्ट्रातील होते. भारत सरकारनं या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानातील सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या भारतातील प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय शोएब अख्तर, बासित अली, शाहीद आफ्रिदी यांच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या भारत सरकारनं बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी  यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.  याशिवाय पाकिस्तानी सेलिब्रेटी  माहिरा खान आणि अली झफर यांची इन्स्टाग्राम खाती देखील ब्लॉक करण्यात आली आहे.

दरम्यान, भारत सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. भारत सरकारनं सिंधू जल करार स्थगित करण्याचा प्रमुख निर्णय घेतला. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना दिले गेलेले व्हिसा रद्द करण्यात आले. जे पाकिस्तानी लोक भारतात होते त्यांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करी कारवाई संदर्भात सैन्य दलाला सर्वाधिकार दिलेले आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानचा बदला घेतला जाईल, असं देखील म्हटलं आहे.