IPL Mega Auction Date : इंडियन प्रीमियर लीग 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. याबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. याबाबतची नियमावली काही दिवसांत जारी केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची कायम ठेवण्याची यादीही जाहीर केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणे मेगा लिलावही दोन दिवसांचा होण्याची शक्यता आहे.


2022 मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावात आयपीएल संघांना जास्तीत जास्त चार खेळाडू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर जास्तीत जास्त खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत फ्रँचायझींमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही फ्रँचायझी जास्तीत जास्त आठ खेळाडूंना कायम ठेवण्याविषयी बोलत आहेत, तर काही म्हणतात की त्यांची संख्या चार किंवा पाचपेक्षा जास्त नसावी.


फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ 


बीसीसीआय सर्व फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत संघात कायम ठेवण्याऱ्या खेळाडूची यादी जाहीर करण्यासाठी सांगितली आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारे, फ्रँचायझी मालकांना आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी त्यांचे खेळाडू अंतिम करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. लिलावासाठी अनेक फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. काही संघ प्रशिक्षक शोधत आहेत.






अनेक संघांनी नवीन मुख्य प्रशिक्षकांची केली घोषणा 


दरम्यान, पंजाब किंग्जने आयपीएल 2025 साठी त्यांच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. संघाने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने झहीर खानला त्यांचा मार्गदर्शक म्हणून घोषित केले होते, तर राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतला आणि संघाने त्याला मुख्य प्रशिक्षक बनवले. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ देखील लवकरच याची घोषणा करू शकतात.


हे ही वाचा -


IND Playing 11 vs Ban : सरफराज खान बाहेर, केएल राहुलला मिळणार संधी? बांगलादेशविरुद्ध भारताची प्लेइंग-इलेव्हन


AFG vs SA : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलचा बदला घेतला