IND vs BAN 1st Test Indian playing XI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (19 सप्टेंबर, गुरुवार) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया एका महिन्याहून अधिक काळानंतर मैदानात उतरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरू शकते.


सरफराज खान बाहेर...


या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराज खानला चेन्नई कसोटीतून बाहेर बसावे लागू शकते. सरफराजच्या जागी स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी संघांची घोषणा करताना, चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा भाग असलेला सरफराज खान दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल, असे सांगण्यात आले आहे. येथून सरफराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.


टीम इंडियाच्या संपूर्ण प्लेईंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार रोहित शर्मासोबत शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जैस्वाल सलामीला दिसू शकतो. त्यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो. कोहलीनंतर पाचव्या क्रमांकाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवली जाऊ शकते. याआधी राहुल इंग्लंड मालिकेत एकच सामना खेळला होता. त्यानंतर स्फोटक खेळी खेळणारा ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळणार आहे.


गोलंदाजी विभागाची धुरा स्टार फिरकीपटू आर अश्विनकडून होऊ शकते. यानंतर कुलदीप यादव जबाबदारी स्वीकारू शकतो. त्यानंतर जसप्रीत बुमराह दहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज किंवा आकाशदीपला संधी मिळू शकते.


बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चेन्नईचा प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आकाश दीप/मोहम्मद सिराज.


हे ही वाचा -


AFG vs SA : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलचा बदला घेतला


क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..


Ind vs Ban 1st Test : कधी, कुठे अन् फ्री कसा पाहू शकता पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्व काही