IPL 2025 Rohit Sharma : आयपीएल 2025 पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल दिसू शकतात. त्याचवेळी, मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. अनेक रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, रोहित मुंबई इंडियन्स सोडू शकतो, तर अनेक रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनू शकतो. कारण आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती. यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवू शकते.




रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले होते. आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला होता, त्यानंतर रोहितला हटवून हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघाची कमान पुन्हा रोहितकडे देऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे.




दुसरीकडे, मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिटेन केले नाही तर रोहितची कर्णधार होण्याची शक्यता वाढू शकते. पण मुंबईकडे सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे तगडे खेळाडू असल्यामुळे हे सांगणेही खूप कठीण आहे.


त्याचवेळी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवला टी-20 टीम इंडियाचा कर्णधार बनवले होते, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकाही जिंकली होती, त्यानंतर आता बीसीसीआय सूर्याला दीर्घकाळ टी-20 टीमचा कर्णधार बनवू शकते. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, हे सर्व मेगा ऑक्शननंतरच कळेल की कोणता खेळाडू मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार?


हे ही वाचा -


महिनाभर MS धोनीनं सोडलं होतं चिकन, मटण...; कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य


IND vs KOR : भारताने दक्षिण कोरियाला पाजले पराभवाचे पाणी; थाटात गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये चीनशी भिडणार 


क्रिकेटचा देव गोलंदाजीतही बाप! बुमराह-भुवनेश्वर पेक्षा सचिन तेंडुलकरच्या जास्त विकेट, जाणून घ्या आकडेवारी