IPL 2024 : आयपीएल 2024 सध्या अंतिम टप्प्यात आहे. चार दिवसांत प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. पण नाणेफेकीवरुन पुन्हा एकदा वाद सुरु झालाय. मागील काही दिवसांपूर्वीच नाणेफेकीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा आयपीएलमधीन नाणेफेक वादात अडकली आहे. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दिल्ली आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यानच्या नाणेफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी या नाणेफेकीवर प्रश्न उपस्थित केलाय. नेटकऱ्यांनी दावा केलाय की, नाणेफेकीसाठी वापरण्यात आलेल्या नाण्यावर फक्त हेड आहे. पण काही जणांनी हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा केलाय. पण काही जणांनी जिओ सिनेमाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करत फक्त हेड्स असल्याचा दावा केला आहे.  आयपीएल 2024 मधील नाणेफेकीवरुन आतापर्यंत दोन ते तीन वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. 


दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यातील नाणेफेक चर्चेत आहे. प्लेऑफसाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा होता. सामना सुरु होण्याआधी नाणेफेक झाली. ऋषभ पंतने नाणेफेकीसाठी नाणं हवेत उडवले... केएल राहुल यानं हेड्स मागितले. नाणेफेक राहुल याने जिंकली. पण नेटकऱ्यांनी नाण्याच्या दोन्ही बाजूला हेड असल्याचा दावा केला. नाणेफेक लखनौच्या बाजूने जावी, म्हणून दोन्ही बाजूला हेड होतं, असा दावाही काही नेटकर्यांनी केलाय. जिओ सिनेमाच्या ओरिजनल व्हिडीओमध्ये नाण्याच्या एकाही बाजूला टेल दिसत नाही. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. अनेकांनी आयपीएलमध्ये फसवणूक होत असल्याचा दावा केलाय. काही जणांनी नाणेफेकीचा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये दाखवलाय, त्यामध्येही फक्त हेड दिसतेय.  


पाहा व्हिडीओ -







दिल्लीचा विजय - 


मोक्याच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल दावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौला 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. दोन्ही संघाचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. त्यांना आघाडीच्या चार संघामध्ये स्थान मिळणं अशक्य आहे.  


आणखी वाचा :


VIDEO : क्रिकेटचं मैदान झालं कुस्तीचा आखाडा, ईशान किशन आणि टीम डेविड भिडले, कोण जिंकलं?