Ishan Kishan And Tim David Wrestling : मुंबई इंडियन्सचा स्टार विकेटकीपर ईशान किशन आणि विस्फोटक फलंदाज टीम डेविड मैदानार कुस्ती खेळताना दिसले. आगामी सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू सराव करत होते. त्यावेळी क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा झालं. होय.. सरावावेळी ईशान किशन आणि टीम डेविड यांनी कुस्तीमध्ये हात अजमावला. हा सरावाचाच एक भाग असल्याचं समजतेय. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर कुस्तीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये ईशान आणि टीम कुस्ती खेळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.  


मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ईशान किशन आणि टीम डेविड वॉर्मअपसाठी कुस्ती खेळत असल्याचं दिसत आहेत. ईशान किशन यानं टीम डेविडला हरवण्याचा जिवापाड प्रयत्न केल्याचं व्हिडीओतून दिसतेय. पण ईशान किशन यानं टाकलेला डाव टीम डेविड यानं हाणून पाडला. दोघांमध्ये झुंज सुरु असताना फलंदाजी कोच कायरन पोलार्डही तिथं उपस्थित असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दोघांना कुस्ती खेळताना पाहून पोलार्डने फक्त स्माईल दिल्याचं व्हिडीओत दिसतत आहे. मुंबईने व्हिडीओ पोस्ट करताना मजेदार कॅप्शनही लिहिलेय.  


पाहा ईशान आणि टीम डेविडच्या कुस्तीचा व्हिडीओ...







मुंबईवर नामुष्की - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात अतिशय खराब कामगिरी झाली. साखळी फेरीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलेय. आयपीएल 2024 मध्ये आव्हान संपणारा मुंबईचा पहिला संघ ठरला होता. मुंबईला 13 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आले. मुंबई इंडियन्स 8 गुणांसह गुणतालिकेत तळाला दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा अखेरचा साखळी सामना लखनौ सुपर जायंट्सविरोधात 17 मे रोज होणार आहे.  


आयपीएल 2024 मध्ये ईशानची कामगिरी - 


मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर फलंदाज ईशान किशन यानं यंदाच्या हंगामात विस्फोटक फलंदाजी केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आले नाही. त्याने 13 सामन्यात 23 च्या सरासरीने आणि 153 च्या स्ट्राईक रेटने 306 धावा केल्या आहेत. ईशान किशन याला फक्त एकच अर्धशतक ठोकता आले. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 इतकी आहे.  


आयपीएल 2024 मध्ये टीम डेविडची कामगिरी : 


मुंबई इंडियन्ससाठी टीम डेविड फिनिशरची भूमिका पार करतो. त्यानं 30 च्या सरासरीने आणि 159 च्या स्ट्राईक रेटने 241 धावा चोपल्या आहेत. त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 45 इतकी आहे.