22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे, त्याआधी एका जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी जावई आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या विरोधात जात असल्याचं दिसत आहे. केएल राहुल जरी घरात आपल्या मुलासारखा असला तरी जोपर्यंत आयपीएल आहे, तोपर्यंत रोहित शर्मा माझा मुलगा असेल, असं सुनील शेट्टी या आयपीएलच्या जाहिरातीमध्ये बोलताना दिसून येत आहे. 


जाहिरातीचा समोर आलेला व्हिडिओ खूप मजेशीर आहे. जेव्हा शर्माजींचा मुलगा म्हणजेच रोहित शर्मा, जो सुनील शेट्टीसोबत डायनिंग टेबलवर बसला आहे, तो केएल राहुलला तिथे बसण्यापासून थांबवतो आणि म्हणतो की तुम्हाला दिसत नाही, इथे फॅमिली डिनर चालू आहे. केएल राहुल यावर प्रतिक्रिया देतो आणि पापा हाक मारताना सुनील शेट्टीकडे पाहतो. पण जसे रोहितने राहुलला बसण्यास नकार दिला, त्याप्रमाणे सुनील शेट्टी देखील आपल्या जावईला जेवणाच्या टेबलावर बसण्यास नकार देतो. तसेच जोपर्यंत आयपीएलची स्पर्धा आहे, तोपर्यंत शर्माजींचा मुलगा माझा मुलगा असेल, असं सुनील शेट्टी बोलत आहे. 


केएल राहुलने शेअर केला व्हिडिओ-


सदर जाहिरातीचा व्हिडिओ स्वत: केएल राहुलने त्याच्या एक्स-हँडलवर शेअर केली आहे आणि त्यासोबत त्याने लिहिले आहे की, या शर्माजींच्या मुलाने येथेही सर्व काही घेतले आहे, मी याचा बदला नक्कीच घेईन. हे लिहिल्यानंतर त्याने रोहित शर्मालाही टॅग केले.






लखनऊ आणि मुंबईचा सामना रंजक होणार-


राहुल एलएसजीचा कर्णधार असेल, रोहित यावेळी एमआयचा खेळाडू असेल आयपीएल 2024 मध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असताना, रोहित शर्मा यावेळी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. केएल राहुलने आपल्या एक्स-हँडलद्वारे बदला घेतल्यावर लखनऊ आणि मुंबई यांच्यातील सामना या हंगामात रंजक होणार हे निश्चित.


केएल राहुल मैदानावर परतणार-


लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीतून सावरत आहे. आता त्यांच्या तब्येतीबाबत सकारात्मक माहिती समोर आली आहे. केएल राहुल आगामी आयपीएल हंगामासाठी फिट असल्याची माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) दिली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामाला केएल राहुल मुकणार नाही, तर तो मैदानात खेळताना दिसणार आहे. ही चाहत्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 


संबंधित महत्वाची बातमी-


IPL 2024 New Rules: यंदाची आयपीएल रंगतदार होणार, नवीन नियम येणार; गोलंदाज अन् अंपायरला फायदा