IPL 2024, Mumbai Indians, Sarfaraz Khan: टीम इंडियाचा (Team India) मिस्टर 360 सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे आगामी आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आयपीएलचं (Indian Premier League) नवं सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. सर्व संघांनी आपापला सराव सुरू केला आहे. मुंबई इंडियन्सही सराव सुरू केला आहे. तरिदेखील सूर्यकुमार यादव मात्र अद्याप मुंबईच्या ताफ्यात सहभागी झालेला नाही. मंगळवारी घेण्यात आलेल्या फिटनेस तपासणीत सूर्या तंदुरुस्त नसल्याचं समोर आलं आहे. अशातच प्रकृतीच्या कारणास्तव सूर्या यंदा आयपीएलच्या काही सामन्यांपासून दूर राहू शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार आयपीएल 2024 च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर पडू शकतो. त्यामुळे आधीच रोहितच्या कर्णधारपदावरुन निर्माण झालेली कॉन्ट्रोवर्सी आणि त्यातच आता सूर्याही खेळताना दिसणार नसल्यामुळे मुंबईच्या फॅन्समध्ये कमालीची नाराजी दिसत आहे. असं असलं तरिदेखील सूर्याच्या दुखापतीमुळे एका नव्या शिलेदाराचं मात्र नशीब पालटू शकतं. सूर्याच्या अनुपस्थितीत सरफराज खानची (Sarfaraz Khan) आयपीएल 2024 सीझनसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाच वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 




सूर्यकुमार यादव गुजरात टायटन्सविरुद्ध 24 मार्चला होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. 'स्पोर्ट्स हर्निया'च्या शस्त्रक्रियेनंतर रिहॅबिलिटशेनसाठी तो बंगळुरू येथील एनसीएमध्ये दाखल झाला होता. डिसेंबरपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या सूर्यकुमारचीही मंगळवारी एनसीएमध्ये फिटनेस चाचणी झाली. त्यानंतर सूर्यकुमार अजूनही खेळण्यासाठी फिट नसल्याचं समोर आलं. मात्र, आता गुरुवारी त्याची पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतरच सूर्या आगामी आयपीएल सीझन खेळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. 


आयपीएलसाठी मुंबईच्या ताफ्यात सरफराजची वर्णी?  


आश्चर्याची बाब म्हणजे, आयपीएल 2024 च्या लिलावात सरफराज खानवर कोणत्याही संघानं बोली लावलेली नव्हती. तो आयपीएल 2024 च्या लिलावाक अनसोल्ड राहिला. दरम्यान, आता असं सांगितलं जात आहे की, सरफराज खान मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होऊ शकतो. जर गरज भासली तर सरफराज ऱान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो. तसेच, तो मुंबई इंडियन्सच्या सूर्याची जागा घेऊ शकतो. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानं सरफराज खानची शिफारस संघ व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत सरफराज खान आयपीएल 2024 च्या आगामी सीझनसाठी मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होऊ शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2024 New Rules: आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये 2 नवे नियम; अंपायर्स अन् बॉलर्सना दिलासा