IPL 2024 New Rules: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचे जेतेपद पटकवण्यासाठी 10 संघांमध्ये लढत होणार आहे. मोहम्मद शमीसारखा प्रतिभावान गोलंदाज आणि जेसन रॉयसारखा स्फोटक फलंदाज यासह अनेक खेळाडू यावेळेस विविध कारणांमुळे आयपीएलमध्ये खेळणार नसले तरी काही नवीन नियमांमुळे 2024मध्ये होणारी ही स्पर्धा विशेष होणार आहे. नेमके कोणते नवीन नियम यंदाच्या आयपीएलमध्ये असणार आहे, हे जाणून घ्या...


एका षटकांत दोन बाऊन्सर


आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्यात एक गोलंदाज एका षटकांत फक्त एक बाउन्सर टाकू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्येही असे होत होते, परंतु २०२४ च्या हंगामात हा नियम बदलण्यात आला आहे. आता गोलंदाज एका षटकात २ बाऊन्सर चेंडू टाकू शकतील. यापूर्वी, हा नियम भारताच्या टी-20 देशांतर्गत स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला आहे. याचा गोलंदाजांना फायदा होणार आहे.


डीआरएसची जागा स्मार्ट रिव्ह्यू सिस्टम घेणार-


आयपीएल 2024 मध्ये आणखी एक नवीन नियम असा असेल की आता डीआरएस ऐवजी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम वापरली जाईल. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आता मैदानात 8 हॉक-आय कॅमेरे बसवले जातील, जे अधिक अचूक निर्णय घेण्यास मदत करतील. आता टीव्ही अंपायर त्याच खोलीत बसणार आहे जिथे दोन हॉक-आय ऑपरेटर बसलेले असतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्टिंग डायरेक्टर टीव्ही अम्पायर आणि हॉक-आय ऑपरेटर यांच्यातील संपर्क म्हणून काम करत असतात. परंतु आता हॉक-आय कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे केवळ टीव्ही अंपायरसमोर सादर केली जाणार आहे.


स्मार्ट रिप्ले सिस्टीम टीव्ही अंपायरला स्प्लिट-स्क्रीन प्रतिमांसह अधिक व्हिज्युअल्सचा संदर्भ देण्याची परवानगी देईल. सीमारेषेवरील पहिल्या क्षेत्ररक्षकाने हवेत घेतलेल्या रिले कॅचचे उदाहरणासह सांगता येईल, पूर्वी प्रसारक बॉल पकडल्याच्या अचूक क्षणी क्षेत्ररक्षकाच्या पाय आणि हातांची स्प्लिट स्क्रीन एकाच वेळी दाखवू शकत नव्हते. नवीन प्रणाली अंतर्गत, या दोन्ही फुटेजसह स्प्लिट स्क्रीन अंपायरला जेव्हा चेंडू पकडला गेला किंवा सोडला गेला तेव्हा दाखवू शकतो.


22 मार्चला आरसीबी आणि सीएके आमने-सामने


22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात पहिली लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारतीय संघाचा आणि  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली देखील संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. 


आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11 


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्जारी जोसेफ.


चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीविरोधातील संभाव्य प्लेईंग 11 - 


ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महीश तीक्षणा आणि मुस्ताफिजुर रहमान.