नवी दिल्ली : आयपीएल 2024 (IPL 2024) मधील 41 मॅच  झालेल्या आहेत. गुणतालिकेत सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पहिल्या स्थानावर आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) दहाव्या स्थानावर आहे. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येंचा विक्रम देखील मोडला गेला आहे. सनरायजर्स हैदराबादनं 287 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या 17 व्या पर्वावर फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळतंय. आतापर्यंत फलंदाजांनी 729 षटकार मारले आहेत. यामध्ये देखील सनरायजर्स हैदराबाद पहिल्या स्थानावर आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर हेनरिक क्लासेन आहे. सनरायजर्स हैदराबादनं 100 षटकारांचा टप्पा पार केला आहे. 


सनरायजर्स हैदराबाद पहिल्या स्थानावर


सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस  पाडलेला आहे. सनरायजर्स हैदराबादनं आतापर्यंतच्या 16 हंगामामध्ये एकदाही षटकारांचं शतक पूर्ण केलेलं नव्हतं. यावेळी मात्र त्यांनी शंभर षटकारांचा टप्पा पार केला आहे. हैदराबादनं पहिल्या 8 मॅचेसमध्येच 108 षटकार मारले आहेत. हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा दोघे षटकार मारणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. 


   
गुणतालिकेत दहाव्या स्थानावर असलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरुनं सर्वाधिक सिक्स मारले आहेत. आरसीबीनं काल स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला असून त्यांनी 90 सिक्स मारले आहेत. 



रिषभ पंतच्या नेतृत्त्वाती दिल्ली कॅपिटल्सनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. चार विजयांसह 8 गुणांसह ते सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमनं 86 षटकार मारले आहेत. रिषभ पंतनं 21 षटकार मारले आहेत. तर, जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं 16 सिक्स मारले आहेत. 


 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, रोमारियो शेफर्ड असे तगडे  फलंदाज आहेत.  मुंबई इंडियन्सनं 85 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा, टीम डेविड, तिलक वर्मा आणि ईशान किशन यांनी 10  पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. 


 
कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, फिल सॉल्ट यांच्यासारखे तगड फलंदाज केकेआरकडे आहेत. कोलकाताच्या संघानं 70 षटकार मारले आहेत.


संबंधित बातम्या :


तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video


 IPL 2024 Virat Kohli: 'संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही...'; कोहलीने अर्धशतक झळकावले, तरीही सुनील गावसकर संतापले!