IPL 2024 SRH vs RR Qualifier 2:आज सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर 2 सामना; फायनलचं तिकीट कुणाला?

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2: हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची राजस्थानच्या रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीसमोर कस लागणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 24 May 2024 11:18 PM
हैदराबादचा फायनलमध्ये प्रवेश

हैदराबादचा फायनलमध्ये प्रवेश.... राजस्थानचं आव्हान संपुष्टात

राजस्थान पराभवाच्या छायेत

पॉवेल 6 धावांवर बाद.. राजस्थान पराभवाच्या छायेत

अभिषेक शर्माची कमाल

अभिषेक शर्माने धोकादायक हेटमायरला केले बाद.. राजस्थानला सहावा धक्का.. 

राजस्थानची फलंदाजी ढेपाळली 

 


रियान परागनंतर अश्विनही तंबूत परतलाय. शाहबाद अहमदने तिसरी विकेट घेत हैदराबादच्या आशा उंचावल्या आहेत.

राजस्थानला चौथा धक्का 

 


रियान पराग 6 धावांवर बाद झालाय. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झालाय. राजस्थान चार बाद 79 धावा

राजस्थानची सावध सुरुवात

अभिषेक शर्माने वादळी 42 धावांची वादळी खेळी करत राजस्थानला वादळी सुरुवात दिली. पण लागोपाठ विकेट पडल्यानंतर धावसंख्या संथ झाली. राजसस्थान 10 षटकानंतर तीन बाद 73 धावा

हैदराबादची 175 धावांपर्यंत मजल

क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवण्यासाठी राजस्थानला 176 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

हैदराबादला आठवा धक्का

मोठा फटका मारण्याच्या नादात शाहबाज अहमद बाद.. 

क्लासेन बाद

हेनरिक क्लासेन याचा त्रिफाळा संदीप शर्माने उडवला.  हैदराबादला सातवा धक्का

हेनरिक क्लासेनचं अर्धशतक

हेनरिक क्लासेनचं अर्धशतक

आवेश खानचा भेदक मारा

हैदराबादला लागोपाठ दोन चेंडूवर दोन धक्के... अब्दुल समदला खातेही उघडता आले नाही.  12 षटकानंतर हैदराबाद 6 बाद 120 धावा

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

नितीश रेड्डीच्या रुपाने हैदराबादला पाचवा धक्का बसला आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर रेड्डीने फेकली विकेट....  13.5 षटकानंतर हैदराबाद  5 बाद 120 धावा

हैदराबादला चौथा धक्का बसलाय.

ट्रेविस हेड 34 धावा काढून बाद, संदीप शर्माने घेतली विकेट..हैदराबाद 4 बाद 99

हैदराबादला तिसरा धक्का

बोल्टने हैदराबादला दिला तिसरा धक्का.... एडन मार्करम एका धावेवर बाद झालाय....

हैदराबादला दुसरा धक्का

राहुल त्रिपाठीच्या रुपाने हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. बोल्टने राजस्थानला दुसरं य़श मिळवून दिले. हैदराबाद दोन बाद 56 धावा... त्रिपाठी 15 चेंडूत 37 धावा काढून बाद

हैदराबादला पहिला धक्का

अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का.. 5 चेंडूत 12 धावा काढून बाद... हैदराबाद एक बाद 13 धावा

सामन्याला सुरुवात

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड डावाची सुरुवात  करण्यास मैदानावर... राजस्थानकडून बोल्टचा मारा

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11  -

टॉम कोहलर-केडमोर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि  युजवेंद्र चहल. 


इम्पॅक्ट प्लेयर : शिमरन हेटमायर, नद्रे बर्गर.




SRH Impact players Shahbaz Ahmed, Mayank Markande, Glenn Phillips, Sanvir Singh, Umran Malik




RR: 1 Yashasvi Jaiswal, 2 Tom Kohler-Cadmore, 3 Sanju Samson (capt & wk), 4 Riyan Parag, 5 Dhruv Jurel, 6 Rovman Powell, 7 R Ashwin, 8 Trent Boult, 9 Avesh Khan, 10 Sandeep Sharma, 11 Yuzvendra Chahal


RR Impact Players - Shimron Hetmyer, Nandre Burger, Shubham Dubey, Donovan Ferreira, Kuldeep Sen

राजस्थानने नाणेफेक जिंकली

संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 

कर्णधार संजू सॅमसनची स्फोटक फटकेबाजी

IPL 2024 SRH vs RR: आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ सज्ज

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: संजू सॅमसनमुळे राजस्थान रॉयल्सचं वाढलं टेन्शन

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: हैदराबादचा प्रशिक्षक व्हिटोरी काय म्हणाला?

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, नंद्रे बर्गर, शुभम दुबे, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, केशव महाराज, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: राजस्थान विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड-

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर झाली आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा भिडले आहेत. सर्व सामने रंगतदार झाले आहेत. सनरायजर्स हैदरादाबने 10 वेळा विजय मिळवलाय, तर राजस्थानला नऊ सामन्यात विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये फक्त एकवेळा सामना झालाय. ज्यामध्ये हैदराबादने विजय मिळवलाय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा पाऊस पाडला होता. धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावांपर्यत मजल मारली होती. हैदराबादने फक्त एका धावेनं सामना जिंकला होता. आता हिशोब चुकता करण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरलाय. 

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: चेन्नईची खेळपट्टी कशी असेल ?

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे, या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊसही पडतो. चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक 200 धावांचा स्कोर झालाय.  सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्मात आहेत. दुसऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

पार्श्वभूमी

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2: आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर हा सामना रंगेल. या लढतीत हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची राजस्थानच्या रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीसमोर कस लागणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.