IPL 2024: सध्या आयपीएल 2024 च्या हंगामात लीग टप्प्यातील अंतिम सामने सुरु आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा एकमेव संघ आहे जो प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ बाहेर पडले आहेत. याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यासह 7 संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. 


आगामी सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) गुजरात टायटन्सचा पराभव केला तर बंगळुरू स्पर्धेतून बाहेर पडेल. तसेच 18 मे रोजी होणाऱ्या चेन्नई आणि बंगळुरुच्या सामन्यावर बरेच काही अवलंबून असेल. आता बंगळुरूच्या एका चाहत्याने एक व्हिडीओ तयार केला आहे, ज्यामध्ये प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी बेंगळुरूला काय करावे लागेल हे सांगितले आहे.


आरसीबीने 720 धावा केल्या आणि सीएसके 0 धावांवर ऑलआऊट-


आयपीएल 2024 च्या प्लेऑफ टप्प्यात प्रवेश करण्यासाठी, लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करणे आरसीबीसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच दृष्टीकोनातून या चाहत्याने विनोदी पद्धतीने स्कोअरकार्ड तयार केले आहे, ज्यामध्ये आरसीबीने निर्धारित 20 षटकांत एकही विकेट न गमावता 730 धावा केल्या आहेत, तर 20 षटकांत विकेट न गमावता केवळ 720 धावा करणे शक्य असल्याचे दाखवले आहे. तर चेन्नई 0 धावांवर ऑलआऊट झाला. त्याहूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे चेन्नईचे सर्व फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाले. अशा प्रकारे आरसीबीचा नेट रनरेट सातव्या गगनाला भिडणार आहे.






बंगळुरुचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे समीकरण काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सध्या 13 सामन्यांत 6 विजय मिळवून 12 गुण जमा केले आहेत आणि संघाचा नेट रनरेट +0.387 आहे. दुसरीकडे, अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचे सध्या 14 गुण आहेत. जर बंगळुरूला टॉप-4 मध्ये स्थान मिळवायचे असेल तर पुढील सामन्यात चेन्नईला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. त्याचवेळी, हैदराबादने पुढील दोन सामने गमावायला हवे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना प्लेऑफमध्ये जाण्याची फारशी आशा नाही कारण त्यांचा नेट रनरेट चांगला नाहीय. दुसरीकडे, हैदराबादने त्यांच्या पुढच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला, तर गुजरातबरोबरच बेंगळुरूही बाहेर पडेल.


संबंधित बातम्या:


IPL 2024: आयपीएलमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस, पाहा बक्षिसांची रक्कम


IPL 2024 RCB: पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या


चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video