IPL 2024: आयपीएलमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस, पाहा बक्षिसांची रक्कम
IPL 2024 चे प्ले ऑफचे सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. (Image Credit-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2024 च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील. यासोबतच पराभूत संघांनाही चांगली रक्कम मिळेल. (Image Credit-IPL)
एका रिपोर्टनूसार, अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळतील. पहिल्या सत्राच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे.(Image Credit-IPL)
अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघालाही मोठी रक्कम मिळणार आहे. तर दुसरं स्थान पटकावणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील.(Image Credit-IPL)
2023 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं होतं. चेन्नईने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.(Image Credit-IPL)
आयपीएलमधील एकूण बक्षीस रकमेवर नजर टाकली तर ती सुमारे 46.5 कोटी रुपये असेल. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.(Image Credit-IPL)
चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील. ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळेल.(Image Credit-IPL)
ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये मिळतील. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ऑरेंज कॅप जिंकतो. पर्पल कॅपसाठी 15 लाख रुपयांची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे.(Image Credit-IPL)