IPL 2024 MS Dhoni: आयपीएल 2024 च्या हंगामात काल चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना राजस्थान रॉयल्सशी (RR) झाला. या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा पराभव केला. या विजयासह चेन्नईचा प्ले ऑफचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. चेन्नईच्या विजयासह भारतीय संघाचा आणि चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडूच्या (Ambati Rayadu) एका विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 


भविष्यात चेन्नईत महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) मंदिर बांधले जाऊ शकते, असं अंबाती रायडूने सांगितले. गेल्या काही वर्षांतील भारत आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी त्याची कामगिरी पाहता, चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर बांधले जाईल. दक्षिण भारतात त्याची क्रेझ लक्षात घेता हे आश्चर्यकारक नाही, असं अंबाती रायडूने सांगितले. 


अंबाती रायडू नेमकं काय म्हणाला? (Ambati Rayadu On MS Dhoni)


धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत एमएस धोनीचे मंदिर चेन्नईमध्ये बांधले जाईल. तो एक असा व्यक्ती आहे, जो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्याने नेहमीच संघासाठी, देशासाठी काम केले आहे. आणि चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.


MS धोनीची आयपीएल 2024 मधील कामगिरी


प्रत्येक चाहत्याला एमएस धोनीला आयपीएल 2024 मध्ये खेळताना पाहायचे होते. अशा परिस्थितीत धोनीनेही चाहत्यांची स्वप्न पूर्ण केली. या हंगामात त्याने अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत चौकार-षटकार मारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. एमएस धोनीने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांमध्ये त्याने 226.67 च्या स्ट्राइक रेटने 136 धावा केल्या आहेत ज्यात 11 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे.


चेन्नईसाठी प्ले ऑफचा मार्ग सुकर-


राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचे 13 सामन्यांत 7 विजयांसह 14 गुण झाले आहेत. चेन्नईचा संघ +0.528 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 18 मे रोजी बेंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात पराभूत करावे लागेल. 


संबंधित बातम्या:


IPL 2024: बंगळुरु अन् चेन्नईचा सामना निर्णयाक ठरणार; प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी किती धावांनी विजय मिळवावा लागणार?, पाहा समीकरण!


IPL 2024 RCB: पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या


चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video