गुवाहाटी : आयपीएल 2024 (IPL 2024) ची लीग स्टेजमधील अखेरची मॅच पावसामुळं रद्द झाली. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील गुवाहाटी येथील मॅच पावसामुळं रद्द करावी लागली. मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं. केकेआर विरुद्धची मॅच रद्द झाली आणि राजस्थान रॉयल्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानाऐवजी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यामुळं राजस्थान रॉयल्सची क्वालिफायरची पहिली मॅच खेळण्याची संधी हुकली. 


राजस्थान रॉयल्सचा एलिमिनेटरमध्ये आल्यानं आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असल्यास आता तीन मॅच खेळाव्या लागतील. राजस्थान दुसऱ्या स्थानावर असतं तर त्यांना क्वालिफायर -1ची मॅच खेळावी लागली असती. ती मॅच जिंकली असती तर राजस्थान अंतिम फेरीत पोहोचलं असतं. आता राजस्थानला एलिमिनेटरमध्ये विजय मिळवावा लागेल. त्यानंतर क्वालिफायर -1 मधील पराभूत संघाबरोबर क्वालिफायर -2 ची मॅच खेळावी लागेल. 


सनरायजर्स हैदराबादनं लीग स्टेजमधील अखेरच्या मॅचमध्ये विजय मिळवत 17 गुण मिळवले. दुसरीकडे पावसामुळं राजस्थान रॉयल्सची दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची संधी हुकली. केकेआर विरुद्ध विजय मिळवला असता तर राजस्थानचे गुण 19 झाले असते. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानं राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादचे गुण 17 झाले. नेट रनरेटच्या आधारे हैदराबाद दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळं राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर पोहोचलं. राजस्थानला एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना करावा लागले. 


केकेआर आणि हैदराबादकडे फायनलमध्ये जाण्याच्या दोन संधी


कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पहिली क्वालिफायर मॅच उद्या (21 मे) होणार आहे.या मॅचमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तर, जो संघ पराभूत होईल त्यांची लढत क्वालिफायर दोन मध्ये एलिमिनेटरच्या मॅचमधील विजयी संघाशी होईल. क्वालिफायर 2 जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी देखील उपलब्ध आहे. त्यामुळं केकेआर आणि सनरायजर्स हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचायचं असल्यास दोन संधी उपलब्ध आहेत. 


प्लेऑफच्या मॅचेसचं वेळापत्रक


क्वालिफायर 1, 21 मे : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
एलिमिनेटर  22 मे : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 
क्वालिफायर 2 ,24 मे :क्वालिफायर-1 चा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता संघ 
अंतिम फेरी 26 मे : क्वालिफायर -1 चा विजेता विरुद्ध क्वालिफायर- 2 चा विजेता संघ     


संबंधित बातम्या :



MS Dhoni : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट, अंतिम निर्णयाआधी चेन्नईकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी