Abhishek Sharma Half Century Sister Celebration हैदराबाद : आयपीएल 2024 चा 69 वा सामना काल हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर  पार पडला. या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जला 4 विकेटनं पराभूत केलं. हैदराबादसाठी सर्वाधिक धावा अभिषेक शर्मानं (Abhisehk Sharma) केल्या. हैदराबादच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये अभिषेक शर्मानं अर्धशतक झळकावतं संघाला विजय मिळवून दिला. अभिषेक शर्मानं अर्धशतक झळकावल्यानंतर त्याची बहीण कोमल शर्मा (Komal Sharma) हिनं सेलिब्रेशन केलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  


भावाचं अर्धशतक बहिणीचं सेलिब्रेशन


पंजाब किंग्ज विरुद्ध अभिषेक शर्मानं अर्धशतक झळकावलं. यानंतर अभिषेक शर्मा बहीण कोमल शर्मा हिच्याकडे इशारा करताना पाहायला मिळाला. कोमल शर्मानं देखील अभिषकचं अभिनंदन केलं. हा सर्व व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला. कोमल शर्मा आणि अभिषेक शर्माच्या या व्हिडीओ आणि फोटोवर चाहते कमेंट करत आहेत.  






अभिषेक शर्मानं आणखी एक रेकॉर्ड नावावर केलं


अभिषेक शर्मानं आणखी एक रेकॉर्ड नावावर केलं. अभिषेक शर्मानं या आपयीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारले. त्यानं विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं. अभिषेक शर्मा आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत. विराट कोहलीनं 2016 च्या आयपीएलमध्ये 38 षटकार मारले होते. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडच्या आक्रमक फलंदाजीमुळं सनरायजर्स हैदराबाद आयपीएलमध्ये एका सीझनमध्ये 150 हून अधिक षटकार मारणारी दुसरी टीम ठरली आहे.


अभिषेक शर्माची आयपीएल 2024 मधील कामगिरी


अभिषेक शर्मानं पंजाब किंग्ज विरुद्ध 28 बॉलमध्ये 66 धावा केल्या. यामध्ये त्यानं 5 चौकार आणि 6 षटकार मारले. अभिषेक शर्मानं  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 13 मॅचमध्ये 467 धावा केल्या आहेत. अभिषेकनं 209.42 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या असून आतापर्यंत तीन अर्धशतकं केली आहेत. सनरायजर्स हैदराबाद गेल्या हंगामात दहाव्या स्थानावर होते. यावेळी त्यांनी प्लेऑफमध्ये धडक दिलीय.


संबंधित बातम्या :


धोनीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, माहीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागितला, सूत्रांची माहिती


Nita Ambani : नीता अंबानींचं मुंबईच्या टीमपुढं भाषण,रोहित-हार्दिकचा उल्लेख करत म्हणाल्या...