चंदीगड: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलमधील 27 वी लढत पार पडली. या लढतीत राजस्थान रॉयल्सनं अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्जला पराभूत केलं. पंजाब किंग्जला आयपीएलमधील चौथा पराभव स्वीकारावा लागला. राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पंजाब संदर्भात आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) गैरहजेरीत कॅप्टन पद सॅम कर्रनला (Sam Curran) नेतृत्त्वाची संधी दिली गेल्यानं वादाला सुरुवात झाली होती. पंजाब किंग्जचा उपकर्णधार जितेश शर्मा (Jitesh Sharma) असताना त्याला का डावललं गेलं, असा प्रश्न विचारण्यात येत होता. वाद वाढू लागताच अखेर पंजाब किंग्जकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.  


आयपीएलच्या सुरुवातीला सर्व संघांच्या कॅप्टनचं फोटोशूट करण्यात आलं होतं त्यावेळी शिखर धवनच्या जागी जितेश शर्मा पंजाब किंग्जचं प्रतिनिधीत्व करताना दिसला होता. त्यानंतर जितेश शर्मा संघांचा उपकॅप्टन असल्याचं मानलं जात  होतं. जितेश शर्माला शिखर धवन नसताना फोटोशूटसाठी पाठवलं गेलं होतं. त्या फोटो शूटचा दाखला देत पंजाब किंग्जच्या मॅनेजमेंटला प्रश्न विचारण्यात येत होते. पंजाब किंग्जच्या हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट संजय बांगर यांन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.  


संजय बांगरनं म्हटलं की,  जितेश शर्माला उपकॅप्टन करण्यात आलेलं नव्हतं. त्यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला सॅम कर्रनला भारतात येण्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळं जितेश शर्माला कॅप्टनच्या मिटींगसाठी पाठवलं गेलं होतं. सॅम कर्रनला उशीर झाल्यानं त्याला ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हायचं होतं. त्यामुळं आयपीएलच्या उद्घाटनसाठी त्याला चेन्नईला पाठवण्यात आलं नव्हतं यामुलं जितेश शर्माला तिकडे पाठवल्याचं संजय बांगर म्हणाले.  


संजय बांगर म्हणाले की जितेश शर्माला कॅप्टनच्या फोटोशूटमध्ये पाठवलं होतं कारण आयपीएलच्या सदस्यांचे तसे निर्देश होते. टीमच्या किमान एका खेळाडूला तरी त्या फोटोशूटमध्ये सहभागी होणं अनिवार्य होतं. मात्र, लोक जितेश शर्माला उपकॅप्टन समजतील, असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. ज्यावेळी  शिखर धवन  उपलब्ध नसेल त्यावेळी सॅम कर्रन हाच कॅप्टन म्हणून काम करेल, असा आमचा निर्णय झालेला होता, असं संजय बांगर म्हणाले.  


पंजाब किंग्जचा चौथा पराभव 


पंजाब किंग्जला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये 3 विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाबनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 147 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून आशुतोष शर्मा आणि लियाम लिव्हिगस्टोननं जोरदार फलंदाजी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या हातून मॅच जाणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना हेटमायरनं मॅच जिंकवून दिली. 


संबंधित बातम्या : 


Punjab Kings vs Rajasthan Royals: 14 चेंडूत 30, मग 4 चेंडूत 10 धावांची गरज; पंजाबचा विजय अन् राजस्थानचा पराभव पक्का झालेला, मग...


मिचेल स्टार्कच्या मदतीला गौतम गंभीर धावला; समीकरण मांडत सडेतोड प्रत्युत्तरही दिलं!