अहमदाबाद : आयपीएलमधील 17 वी (IPL 2024) मॅच काल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात पार पडली. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं पंजाब विरोधात 4 विकेटवर 199 धावा केल्या होत्या. पंजाबच्या युवा खेळाडूंनी शिखर धवन, जॉनी बेयरस्टो लवकर बाद झाल्यानंतर संयमी खेळी करुन विजय मिळवून दिला. पंजाबच्या या विजयाचा शिल्पकार शशांक सिंग ठरला. शशांक सिंगवर मॅच जिंकल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. मात्र, त्याच्यासोबत घडलेला एक प्रकार अनेकांच्या नजरेतून सुटू शकला नाही. 


शशांक सिंगसोबत काय घडलं?  


गुजरात टायटन्स आणि  पंजाब किंग्ज यांच्यातील मॅचमध्ये शिखर धवननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सच्या फलदाजांनी 1 बाद  199 धावा करत पंजाबपुढं विजयासाठी 200 धावांचं आव्हान ठेवलं.गुजरातकडून शुभमन गिलनं 89 धावांची खेळी केली. शुभमन गिलच्या 89 धावांच्या जोरावर गुजरातनं 4 विकेटवर 199 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात करण्यासाठी निराशाजनक झाली होती. मात्र शशांक सिंगनं, जितेश शर्मा आणि आशुतोष शर्मा यांच्या साथीनं पंजाबला विजय मिळवून दिला. 


पंजाबच्या विजयानंतर अभिनंदन पण..


शशांक सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर  पंजाब किंग्जनं विजय मिळवला. शशांक सिंग एका बाजूनं मैदानावर तळ ठोकून उभा राहिला होता. दुसऱ्या बाजूनं त्याला सिकंदर रझा, जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माचं सहकार्य मिळालं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानं 31 धावा केल्या. शशांक सिंगनं पंजाबनं दिलेल्या संधींचं सोन करुन 61 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबच्या विजयानंतर शशांक सिंगचं सर्वांनी अभिनंदन केलं. मात्र, शशांक सिंगसोबत घडलेला एक प्रकार मात्र अनेकांच्या नजरेतून सुटला नाही. 


शशांक सिंगनं आयपीएलमध्ये पहिलं अर्थशतक झळकावलं त्यावेळी त्याचं कुणीच अभिनंदन करताना दिसून आलं नाही. शशांक सिंगचं अभिनंदन त्याच्या टीममधील सहकाऱ्यांनी देखील केलं नसल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे अहमदाबादच्या प्रेक्षकांनी देखील शशांक सिंगचं अभिनंदन केलं नसल्याचं समोर आलं, हा प्रसंग अनेकांच्या नजरेतून सुटू शकला नाही. 






पंजाबचा विजय, गुणतालिकेत उलटफेर


पंजाब किंग्जनं यंदाच्या आयीपएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या चार मॅचपैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यामुळं पंजाब किंग्जचे चार गुण झाले आहेत.  पंजाबनं गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर झेप घेत पाचवं स्थान पटकावलं तर गुजरात टायटन्सची सहाव्या स्थानावर घसरण झाली.  


संबंधित बातम्या : 


IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण


Shashank Singh: चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं जिंकवलं; सामना संपल्यावर मालकीण प्रीती झिंटाने काय केलं?, पाहा!