मुंबई: आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अजूनही पहिला विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रायल्स यांच्या विरोधातील मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईची पुढील मॅच आता रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवणार का हे पाहावं लागणार आहे.
मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्स विरोधात 7 एप्रिलला होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे. या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सची टीम नेमकी कुठं गेली होती याबाबत माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सनं एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईनं शेअर केलेल्या व्हिडीओत कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मासह इतर खेळाडू ट्रीपसाठी जामनगरला गेले असल्याचं समोर आलं आहे. ट्रीपवर असताना ते खूप आनंद लुटत असल्याचं दिसून आलं आहे.
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचनंतर पुढच्या मॅचसाठी सहा दिवसांचा कालावधी होता. या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सची टीम ट्रीपसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सनं इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई इंडियन्स शेअर केलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गळाभेट घेत असल्याचं दिसत असून इतर खेळाडू वॉटर स्पोर्टस खेळताना दिसत आहेत. पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर मुंबईनं आपल्या खेळाडूंना तणावमुक्त ठेवण्यासाठी ट्रीपचं आयोजन केल्याचं बोललं जात आहे.
पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची यंदा चांगली सुरुवात झालेली नाही. मुंबईला गुजरात टायटन्स,सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईनं टीममधील क्रिकेटपटूंचं मनोबल वाढवण्यासाठी जामनगरला ट्रीप आयोजित केली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई इंडियन्स कमबॅक करणार?
मुंबई इंडियन्सची यापूर्वीच्या आयपीएलमध्ये देखील अशाच प्रकारची कामगिरी झालेली आहे. मात्र, त्यानंतर मुंबई इंडियन्सनं कमबॅक केलं होतं. आयपीएलच्या एका पर्वात मुंबई इंडियन्सनं पहिल्या चार सामन्यातील पराभवानंतर पाचव्या लढतीत विजय मिळवला आणि विजयाचं अभियान सुरु करत विजेतेपद पटकावलं होतं. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला नुकताच दिलासा मिळाला असून मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव संघात परतला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मैदानात उतरेल की नाही हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :