IPL 2024 Preity Zinta Reaction On MS Dhoni Wicket: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात हर्षल पटेलने एमएस धोनीला (MS Dhoni) शून्यावर बाद केले. धोनी बाद झाल्यानंतर पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटा खूप आनंदी झाली. तिचा यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनी बाद होताच सामन पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. तर प्रती झिंटा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसली. प्रिती झिंटाची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, धोनी बोल्ड होत असताना प्रिती झिंटा उठून टाळ्या वाजवू लागली. यावेळी चेन्नईचे चाहते पूर्णपणे निराश दिसत होते. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनी 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनीने टी20 कारकिर्दीत प्रथमच नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली.
चेन्नईने हा सामना 28 धावांनी जिंकला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 विकेट गमावत 167 धावा केल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 26 चेंडूत 43 धावा केल्या, ज्यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सजला 20 षटकांत 9 गडी बाद 139 धावाच करता आल्या. अशा प्रकारे चेन्नईने हा सामना 28 धावांनी जिंकला. चेन्नईसाठी जडेजाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल केली. जडेजाने 4 षटकांत केवळ 20 धावा देऊन 3 बळी घेतले.
गुणतालिकेची काय स्थिती?
आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचा संघही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
MS धोनीने खेळू नये, चेन्नईने त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा; हरभजन सिंग संतापला