IPL 2024 MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पंजाब किंग्सविरुद्ध (PBKS) 28 धावांनी विजय नोंदवून प् लेऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 166 धावा केल्.या परंतु आतापर्यंत या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणारा एमएस धोनी (MS Dhoni) खाते न उघडता माघारी परतला. धोनीला त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलने क्लीन त्रिफळाचीत केले.


एमएस धोनीने आतापर्यंतच्या टी-20 कारकिर्दीत प्रथमच 9व्या क्रमांकावर फलंदाजी केली. धोनीने या हंगामात आतापर्यंत फिनिशरची भूमिका निबावली. धोनी बहुतेक सामन्यांमध्ये 1-2 षटके शिल्लक असताना फलंदाजीला येतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या आधी मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आले. यावरुन भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने नाराजी व्यक्त केली आहे. 


हरभजन सिंग धोनीवर का चिडला?


चेन्नई सुपर किंग्ससाठी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग या निर्णयाने फारसा प्रभावित झाला नाही. हरभजन सिंग म्हणाला की, धोनी जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर चेन्नईने त्याच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज आणावा. जर एमएस धोनीला 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाजाचा समावेश करणे चांगले. 


शार्दुल धोनीसारखा पराक्रम करू शकत नाही-


शार्दुल ठाकूर कधीही धोनीसारखे फटके मारू शकत नाही आणि धोनीने ही चूक का केली हे मला समजत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही आणि 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय दुसऱ्याने घेतला हे मी मान्य करणार नाही. चेन्नईला वेगाने धावा करण्याची गरज होती आणि धोनीने गेल्या सामन्यांमध्ये हे केले आहे. आज जरी चेन्नईने सामना जिंकला तरी मी धोनीला फोन करेन. लोकांना जे हवं ते म्हणू द्या. जे योग्य आहे तेच मी सांगेन, असं हरभजन सिंगने सांगितले.


धोनी शून्यावर बाद-


आयपीएलच्या या मोसमात, धोनी सीएसकेच्या डावातील शेवटची काही षटके फलंदाजीसाठी येत आहे, त्यामुळे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात आला तेव्हा फक्त 7 चेंडू खेळायचे बाकी होते. हर्षलने एक संथ चेंडू धोनीकडे टाकला, त्यावर त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला. 


चेन्नईने विजयासह टॉप-4 गाठले


पंजाब किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात एके काळी 167 धावा करून चेन्नई सुपर किंग्जचा विजय जरा अवघड वाटत होता, पण रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने पंजाबचा 139 धावांनी पराभव केला.हा सामना जिंकून चेन्नई पुन्हा एकदा 12 गुणांसह आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहोचले आहे.


गुणतालिकेची काय स्थिती?


आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचा संघही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video