IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 च्या हंगामात काल (5 मे रोजी) दोन सामने खेळवले गेले. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पंजाब किंग्स आणि दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला गेला. पंजाब विरुद्ध चेन्नईने विजय मिळवला, तर लखनैविरुद्ध कोलकाताने विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी, तर कोलकाताना पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थाचा संघ दुसऱ्या स्थानी असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
कोलकाताने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यामध्ये 8 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात कोलकाताला पराभवाचा सामना करायला लागला. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचे देखील 16 गुण आहेत. राजस्थानने 10 सामन्यात 8 विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि राजस्थानने प्ले ऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
तीन संघांमध्ये चुरस-
गुणतालिकेत उर्वरीत दोन जागांसाठी तीन संघांमध्ये चुरल रंगली आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स यांच्यात सामना-
आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.