IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स आज कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार
IPL 2024 MI vs KKR: मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे.
मुंबईचा 24 धावांनी पराभव.... मुंबई प्लेऑफचं आव्हान संपलं
पियूष चावला गोल्डन डकचा शिकार झालाय. मुंबईला नऊ चेंडूवर 26 धावांची गरज
टीम डेविड याला स्टार्कनं केले बाद.. श्रेयस अय्यरने घेतला शानदार झेल.. मुंबईला विजयासाठी 10 चेंडूत 26 धावांची गरज आहे.
मुंबईला विजयासाठी 12 चेंडूत 32 धावांची गरज आहे. कोलकात्याला तीन विकेटची गरज
अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव बाद झालाय.
मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवनं अर्धशतक ठोकलं. सूर्यानं 30 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक
मुंबईचे आघाडीचे सर्व फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. रोहित शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मुंबई 6 बाद 81 धावा
वेंकटेश अय्यरची शानदार फलंदाजी.. कोलकात्याची 169 धावांपर्यंत मजल
मिचेल स्टार्क शून्यावर तंबूत परतला...
रमनदीप तंबूत परतला.. कोलकात्याला आठवा धक्का
आंद्रे रसेलच्या रुपाने कोलकात्याला सातवा धक्का बसलाय. रसेल सात धावा काढून बाद झाल.
मनिष पांडेच्या रुपाने कोलकात्याला सहावा धक्का बसला. हार्दिक पांड्यानं 84 धावांची भागिदारी तोडली. मनिष पांडे यानं 31 चेंडूत 41 धावांची खेळी केली.
कोलकात्याची खराब सुरुवात.. 43 धावांवर चौथी विकेट गमावली. हार्दिक पांड्याने नारायणला पाठवलं तंबूत
नुवान तुषाराचं तिसरं यश.. श्रेयस अय्यर 6 धावांवर बाद
रघुवंशीच्या रुपाने कोलकात्याला दुसरा दक्का बसला. 6 चेंडूमध्ये 13 धावा काढून बाद झाला. नुवान तुषाराला दुसरं यश
फिलिप सॉल्टच्या रुपाने कोलकात्याला पहिला धक्का
इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह , नमन धीर, नुवान तुषारा
राखीव खेळाडू - रोहित शर्मा, शॅम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमरिओ शेफर्ड
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, अंगकृष्ण रघुवंशी, वरुण चक्रवर्ती.
राखीव खेळाडू -
चेतन सकारिया, अनुकुल रॉय, शेफर्न रुदरफोर्ड, केशस भरत, मनिष पांडे
मोहम्मद नबीला बाहेरचा रस्ता... नमन धीरला दिली संधी
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली.. प्रथम गोलंदाजीचा निर्णय
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती. (इम्पॅक्ट सब्सटीट्यूट: अंगकृष्ण रघुवंशी)
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह (इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट: नमन धीर)
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे बरेच चौकार आणि षटकारही मारले जातात. खेळपट्टीवर चांगल्या उसळीमुळे चेंडू सहज बॅटवर येतो. अशा परिस्थितीत येथे 200 धावांचाही सहज पाठलाग करता येईल. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 234 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत वानखेडे स्टेडियमवर हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल, असे मानले जात आहे. पहिल्या डावात गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भरत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंता चमीरा, हर्षित रॉय मुजीब उर रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी, फिलिप सॉल्ट.
रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.
पार्श्वभूमी
IPL 2024: Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: आज मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होईल. मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. गुणतालिकेत कोलकाताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -