Surya Kumar Yadav मुंबई :आयपीएलचं (IPL 2024) 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलसाठी नेतृत्त्व बदल केला आहे. रोहित शर्माच्या जागी मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं हार्दिक पांड्याला(Hardik Pandya) कॅप्टन म्हणून संधी दिली आहे. आयपीएलच्या गेल्या दोन पर्वांमध्ये विजेतेपदापासून दूर राहिलेल्या मुंबईला यंदा विजेतेपद मिळवायचं आहे. या उद्देशानं हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतग्रस्त असल्यानं तो गुजरात विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई इंडियन्सकडून गेल्या 2023 च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नेहाल वढेराला(Nehal Wadhera) संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये  गुजरात विरुद्धच्या मॅचमधून मोहीम सुरु करेल. 24 मार्चला गुजरात आणि मुंबई यांच्यात पहिली लढत होणार आहे. या लढतीत सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं खेळू शकणार नसल्यानं नेहाल वढेरा याला संधी मिळू शकते. नेहाल वढेरानं 2023 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. 


कोण आहे नेहाल वढेरा? 


2023 च्या आयपीएलमध्ये नेहाल वढेराला मुंबई इंडियन्सनं संधी दिली होती. या हंगामात नेहाल वढेरानं  14 मॅचमध्ये 26.77 च्या सरासरीनं 241 धावा केल्या होत्या. नेहाल वढेराच्या बॅटिंगनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


नेहाल वढेरानं आयपीएलच्या गेल्या पर्वात 145.18 च्या स्ट्राइक रेटनं  धावा केल्या होत्या. आता सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असल्यानं मुंबई इंडियन्सकडून नेहाल वढेराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


सूर्यकुमार यादवनं काल आयपीएलमधील मुंबईच्या पहिल्या मॅचमध्ये खेळता येणार नसल्याचे संकेत दिले होते. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा हा सीझन महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईच्या टीमला आयपीएलच्या गेल्या दोन हंगामामध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावता न आल्यानं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला पुन्हा टीममध्ये आणून मुंबईनं त्याच्यावर नेतृत्त्वाची धुरा सोपवली आहे. हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्याच आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिलं होतं. मुंबईची टीम 2024 आयपीएलमध्ये विजय मिळवणार का हे पाहावं लागणार आहे. 


दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबईचा दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात 27 मार्चला होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरोधात 1 एप्रिलला होणार आहे.


संबंधित बातम्या : 



IPL: आयपीएलमध्ये एकही मॅच न खेळल्यास खेळाडूंना पैसे मिळतात का? पूर्ण रक्कम मिळते की नाही? जाणून घ्या नियम