IPL 2024 MI vs SRH LIVE Score: हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी लोंटागण घातलं. पांड्या आणि चावला यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी शानदार फलंदाजी केली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेटच्या मोबदल्यात 173 धावा केल्या. हेड यानं 48 तर कमिन्सने 35 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 174 धावांचे आव्हान आहे. 


मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात शानदार झाली, पण त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी 6 धावांची सलामी दिली. पण अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. अभिषेक शर्मा 16 चेंडूत 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंक अग्रवाल फक्त पाच धावा काढून बाद झाला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर हेड आणि रेड्डी यांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला. 


हैदराबादची फलंदाजी ढेपाळली - 


ट्रेविस हेड आणि रेड्डी यांच्या जोडी जमली असे वाटत होते, पण त्याच वेळी अनुभवी पियुष चावलाने हेडला बाद केले. ट्रेविस हेड याने 30 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली. हेड यानं आपल्या शानदार खेळीमद्ये एक षटकार आणि सात चौकार ठोकले. हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेनही लगेच तंबूत परतला. पियुष चावला यानेच त्याचा अडथळा दूर केला. क्लासेन फक्त दोन धावांवर त्रिफाळाचीत झाला. नितीश रेड्डी 15 चेंडूमध्ये 20 धावा काढून बाद झाला.यामध्ये दोन चौकाराचा समावेश होता. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर शाहबाज अहमद आणि मार्को यान्सन यांनी डाव संभाळण्याचा जिवापाड प्रयत्न केला. पण मुंबईच्या गोलंदाजीसमोर ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. मार्को यान्सन यानं 12 चेंडूमध्ये 17 धावा जोडल्या. त्यानं आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तर शाहबाद अहमद याने 12 चेंडूत 10 धावा केल्या. अब्दुल समद आज फ्लॉप केला. समदला फक्त चार चेंडूत तीन धावा काढता आल्या. 


कमिन्सचा फिनिशिंग टच -


हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं शानदार फलंदाज केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर कमिन्स यानं हैदराबादी धावसंख्या वाढवली. कमिन्स यानं अखेरीस 205 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. कमिन्सने दोन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावा केल्या. कमिन्सच्या शानदार खेळीच्या बळावर हैदराबादचा संघ 173 धावांपर्यंत मजल मारु शकला. सनवीर सिंह यानं आठ धावा करत कमिन्सला चांगली साथ दिली.


हार्दिक-चावलाचा भेदक मारा - 


हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी आज भेदक मारा केला. पांड्यानं 4 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर पियुष चावला यानं 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. चावलाने क्लासेन, हेड आणि समद यांना तंबूत पाठवले. तर हार्दिक पांड्याने नितीश रेड्डी, अब्दुल समद आणि मार्को यान्सन यांना बाद केले. जसप्रीत बुमराहने 23 धावांच्या मोबदल्या एक विकेट घेतली. तर अंशुड कंबोज यानेही एक विकेट घेतली. नुवान तुषारा याला विकेट घेण्यात अपय़श आले.



सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11:
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, मार्को जानेसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन 


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11:
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा