Team India Jersey for T20 world cup : टी20 विश्वचषकाला चार आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतीय संघाकडून विश्वचषकाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज टीम इंडियाची विश्वचषकासाठीची जर्सी लाँच करण्यात आली आहे. धर्मशालामध्ये टीम इंडियाची जर्सी लाँच करण्यात आली. भगव्या आणि निळ्या रंगाची जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. adidas india च्या अधिकृत सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर्सी लाँच करण्यात आली आहे. टी20 विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या टीम इंडियाच्या जर्सी अनेकांना आवडली नाही. सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी याला आतापर्यंतची सर्वात खराब जर्सी असल्याचं म्हटलं आहे. 


टीम इंडियाच्या जर्सीचं डिजाइन


टी20 वर्ल्ड कप 2024 साठी तयार करण्यात आलेल्या जर्सीमध्ये निळा आणि भगवा रंगाचा वापर करण्यात आला आहे. खांद्यावर 3 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावण्यात आल्यात. त्याशिवाय स्पॉन्सर असणाऱ्या Dream 11 चं नाव जर्सीवर दिसत आहे. त्याच्या खाली इंडिया असं नाव मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे.


 






सोशल मीडियावर ट्रोल - 


टीम इंडियाच्या नव्याकोऱ्या जर्सीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ट्रोल केलं. अनेकांनी या जर्सीला अतिशय खराब असल्याचं म्हटलेय. तर काहींनी गेल्या विश्वचषकाची जर्सी पोस्ट केली आहे. काही नेटकऱ्यांच्या मते ही जर्सी आतापर्यंतची सर्वात खराब जर्सी आहे. ट्रेनिंग जर्सी आणि भारतीय संघाच्या जर्सीची मिक्स जर्सी तयार केलेय, यामध्ये नवीन काहीच नाही, असे काहींनी म्हटलेय. 


दोन जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. तर 9 जून रोजी पाकिस्तानविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 


T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, चहल. मोहम्मद सिराज.


विश्वचषकाचा गट असा असेल -


अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ