MI vs SRH IPL 2024 : वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉर्मात असलेला हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्स साखळी सामन्यातील पहिल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हैदराबादने मुंबईविरोधात 277 धावांचा डोंगर उभारला होता, याचं प्रत्युत्तर देण्यास मुंबई सज्ज आहे. 


दोन्ही संघात बदल - 


हैदराबाद आणि मुंबई संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. हैदराबादकडून एडन माक्रम प्लेईंग 11 चा सदस्या नाही. तर मुंबईनं गेराल्ड कोइत्जे याला संघाबाहेर ठेवलं आहे. मुंबईने अंशुल कंबोज याला संधी दिली आहे. अंशुल कंबोज हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळतो. अष्टपैलू अंशुल कंबोज याला संघात स्थान दिलेय. हैदराबादकडून मयांक अग्रवाल याला संधी दिली आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. 


पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 -


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11:


 ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा


इम्पॅक्ट प्लेअर - नेहाल वढेरा, सॅम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमारिओ शेफर्ड 


सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11:


अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, मार्को जानेसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन


इम्पॅक्ट प्लेअर - उमरान मलिक, मयांक मार्केंडेय, ग्लेन फिलिप्स,सनवीर सिंह, जयदेव उनादकट


मुंबई हैदराबादचं गणित बिघडवणार का?


आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत आठ पराभवाचा सामना करावा लागलाय. आता मुंबईचा संघ स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स हैदराबादचं गणित बिघडवू शकते. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. हैदराबादचा संघ 12 गुणासह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून हैदराबाद प्लेऑफच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल, पण स्पर्धेतील आव्हान संपलेल्या मुंबईचं तगडं आव्हान असेल.


वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?
वानखेडेचं मैदाना छोटं असल्यामुळे सहज धावा होतात. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यास कोणत्याही संघाला फायदेशीर ठरतं. कारण सायंकाळी दव पडण्याची शक्यता असते. कमीत कमी 180 ते 200 धावा होऊ शकतात.