MI vs RR Live Score IPL 2024 : राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 9 विकेटनं दणदणीत विजय
MI vs RR Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. आयपीएलमधील ही 38 वी लढत आहे.
राजस्थान रॉयल्सनं यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन,जोस बटलरच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं दिलेलं 179 धावांचं आव्हान पूर्ण केलं.
यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं अर्धशतकी भागिदारी केली आहे.
यशस्वी जयस्वालनं राजस्थानला ज्यावेळी आवश्यकता त्याचवेळी फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. जोस बटलर बाद होऊनही यशस्वी जयस्वालनं आक्रमक फटेकबाजी सुरु ठेवली.
यशस्वी जयस्वालनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं अर्धशतक केलं आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला सूर गवसला.
राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला आहे. जोस बटलर 35 धावा करुन बाद झाला आहे.
राजस्थान मुंबई मॅचवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे.
राजस्थान रॉयल्सनं 50 धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं आक्रमक सुरुवात केलीय.
राजस्थान रॉयल्सनं 50 धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं आक्रमक सुरुवात केलीय.
राजस्थान रॉयल्सनं 50 धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं आक्रमक सुरुवात केलीय.
राजस्थान रॉयल्सनं 179 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली आहे.
राजस्थानच्या संदीप शर्मानं आणखी एक विकेट घेत मुंबईला नववा धक्का दिला आहे. टिम डेव्हिड 3 धावांवर बाद झाला. तर, मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 179 धावा केल्या.
राजस्थानच्या संदीप शर्माकडून मुंबईला एकाच ओव्हरमध्ये दुसरा धक्का देण्यात आला आहे. कोटजिया शुन्यावर बाद झाला आहे.
20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर तिलक वर्मा बाद झाला. त्यानं 65 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला सहावा धक्का बसला आहे. कॅप्टन हार्दिक पांड्या 10 धावा करुन बाद झाला.
मुंबई इंडियन्सचा डाव सावरणारा नेहाल वढेरा 49 धावांवर बाद झाला
मुंबई इंडियन्सनं 150 धावांचा टप्पा पार केला आहे. मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा आणि नेहाल वढेरानं मुंबईसाठी महत्त्वाची खेळी केली.
मुंबईचा डाव सावरण्यात तिलक वर्मानं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं अर्धशतक करुन मुंबईचा डाव सावरला.
नेहाल वढेरा आणि तिलक वर्मानं मुंबई इंडियन्सचा डाव सावरला आहे. मुंबई इंडियन्सच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. दोघांनी 61 धावांची भागिदारी केलीय.
मुंबईनं 7 व्या ओव्हरला 50 धावा पूर्ण केल्या आहेत. मोहम्मद नबी 23 धावा करुन बाद झाला. 52 धावांवर मुंबईला चौथा धक्का बसला. युजवेंद्र चहलनं मोहम्ममद नबीला बाद केलं.
मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला असून सूर्यकुमार यादव 10 धावांवर बाद झाला आहे.
राजस्थाननं मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकललं आहे. रोहित शर्मा 6 धावा आणि ईशान किशन शुन्यावर बाद झाला आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ
मुंबई इंडियन्सचा संघ
मुंबईनं टॉस जिंकला असून हार्दिक पांड्यानं पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सचा आजच्या मॅचमध्ये पराभव करुन गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवण्याच्या इराद्यानं राजस्थान मैदानात उतरेल.
राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबई सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला आज विजय मिळवायचा असल्यास रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवला चांगली कामगिरी करावी लागेल.
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन विजय मिळवता आलेत. आजच्या मॅचमध्ये चौथा विजय मिळवल्यास त्यांचे गुण 8 होऊ शकतात.
मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सनं वानखेडे स्टेडियमवर पराभव केला होता. आता राजस्थान रॉयल्सचा त्यांच्या होमग्राऊंडवर पराभव करण्याची संधी मुंबईकडे आहे.
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आतापर्यंत 29 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईनं 15 वेळा तर राजस्थाननं 13 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
पार्श्वभूमी
MI vs RR Live Score Updates IPL 2024 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येत आहेत. राजस्थानच्या होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच पार पडेल. वानखेडे स्टेडियमवर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मुंबईला त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -