IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders:  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने 24 धावांनी मुंबईचा पराभव केला. या पराभवामुळे मुंबईचं यंदाच्या हंगामातील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्यानं दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 145 धावाच करता आल्या.


मुंबईच्या या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) प्रश्न उपस्थित केला आहे. इरफान पठाण ट्विट करत म्हणाला, समालोचन करत असताना मी सामन्यादरम्यान एक प्रश्न उपस्थित केला होता. नमन धीरकडून गोलंदाजी करण्याचं कारण काय? जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने 57 वर 5 विकेट्स गमवले आहेत. का?, असं इरफान पठाण म्हणाला. तसेच वानखेडेवर इतका कमी स्कोअर असूनही कोलकात्याने काय विजय मिळवला, असं अभिनंदन करणारं ट्विट करत इरफान पठाणने मुंबईच्या जखमेवर मीठंही चोळलं. 






मुंबईचा पराभव-


केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले. 


कोलकाताची भेदक गोलंदाजी-


विशेषत: फिरकीपटूंनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी शानदार गोलंदाजी केली. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी 4 षटके टाकली आणि दोघांनी 22 धावांत 2-2 विकेट घेतल्या. त्याने मधल्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून रोखले. मिचेल स्टार्कने शेवटच्या षटाकांत वर्चस्व गाजवत 4 विकेट्स घेतल्या. वास्तविक, सामन्याचा गेम चेंजर आंद्रे रसेल होता, ज्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत सामना केकेआरकडे वळवला, त्याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची विकेटही घेतली.


संबंधित बातम्या:


मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल


सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?


पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's