Hardik Pandya, IPL 2024 : मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. ईडन गार्डन मैदानावर कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करत 169 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ फक्त 145 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईचा यंदाच्या हंगामातील 11 सामन्यातील हा आठवा पराभव ठरला. सततच्या पराभवामुळं मुंबईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. कोलकात्याविरोधातील पराभवानंतर बोलताना हार्दिक पांड्यानं गोलंदाजांचं कौतुक केले. त्याशिवाय हा सामना नेमका कुठं गमावला, याबाबतच सांगितलं. तसेच परिस्थिती कोणतीही असेल, तरीही लढत राहा, असं स्वत:ला सांगत असतो, असेही पांड्या म्हणाला. 


मुंबईच्या पराभवाच कारण काय? 


कोलकात्याविरोधात सामना गमावल्यानंतर हार्दिक पांड्यानं नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलं. हार्दिक पांड्या म्हणाला की, "धावांचा पाठलाग करताना आम्ही 
भागीदारी करू शकलो नाही आणि ठरावीक अंतराने विकेट्स गमावत राहिलो. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरे मिळण्यास वेळ लागेल. पण सध्या त्यावर काहीही बोलायचं नाही. "


"खेळपट्टी अप्रतिम आणि चांगली होती, प्रत्येक गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात दब आलं होतं. पण ठरावीक अंतराने विकेट फेकल्या गेल्या. पुढील सामन्यात काय करु शकतो, ते पाहूयात. लढत राहा, हेच मी स्वतःला सांगत असतो. हे आव्हानात्मक आहे, परंतु तुम्ही आव्हाने स्वीकारायलाच हवी, असे हार्दिक पांड्या म्हणाला." 






कोलकात्याचा 24 धावांनी विजय - 


कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 12 वर्षानंतर मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियमवर पराभव केला.  कोलकात्यानं मुंबई इंडियन्सवर 24 धावांनी विजय मिळवला. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 169 धावांपर्यंत मजल मारली होती. कात्याकडून वेंकटेश अय्यर यानं 70 धावांची शानदार केळी केली होती. प्रत्युत्तर दाखल मुंबईचा संघ 145 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव यानं एकाकी झुंज दिली. त्यानं शानदार अर्धशतक ठोकलं, पण त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. सूर्यकुमार यादव यानं 35 चेंडूमध्ये 56 धावा केल्या. यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकाराचा समावेश होता. कोलकात्याकडून सुनिल नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क यानं चार विकेट घेतल्या.