लखनौ: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) जिथं जातो तिथं त्याला फॅन्सचा गराडा पाहायला मिळतो. चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) माजी कॅप्टनला पाहायला चाहते मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी असतेच स्टेडियम बाहेर देखील धोनीला पाहायला चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. चेन्नईमधील चेपॉकचं स्टेडियम, अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम, मुंबईतील वानखेडे स्टेडियम असो सगळीकडे धोनीच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. महेंद्रसिंह धोनीला पाहायला आलेल्या गर्दीचा एक व्हिडीओ दीपक चहरनं शेअर केला आहे. 


दीपक चहरनं लखनौच्या एकाना स्टेडियमवरील एक फोटो शेअर केला आहे. चेन्नई सुपर किंग्जची टीम बसमधून ग्राऊंडवर जात असताना धोनीच्या चाहत्यांचा जनसागर जमलेला पाहायला मिळतो. धोनीच्या चाहत्यांनी हात उंचावून जल्लोष केला. दीपक चाहरनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. 






आज लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंटस आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मॅच सुरु आहे. लखनौनं टॉस जिकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनीचा काल देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये लखनौच्या एअरपोर्टवरुन चेन्नईची टीम निघालेली असताना धोनीच्या स्वागतसाठी चाहते मोठ्या संख्येनं थांबलेली पाहायला मिळाली. धोनीनं देखील चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं होतं. 


 आयपीएलच्या यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चांगलात फॉर्ममध्ये आहे. मैदानात फलंदाजीसाठी उतरल्यावर तो गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतोय. एका सामन्यात तर तो फक्त चार तेंडू खेळला. मात्र या चार चेंडूत त्याने तीन षटकार मारत 20 धावा केल्या. त्याच्या फलंदाजाची चाहते आतुरतने वाट पाहात आहेत. आथा चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनौ संघाशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यातही धोनीची बॅट अशीत तळपायला हवी, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सामन्यात धोनी खरंच आपला जलवा दाखवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


दरम्यान, चेन्नई सपुर किंग्ज सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईनं यंदाच्या आयपीएलमध्ये चार विजय मिळवले असून आज त्यांना पाचवा विजय मिळवण्यात यश येते का ते पाहावं लागणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं चार बॉलमध्ये तीन षटकार मारत 20 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या मॅचेस जिथं झाल्या तिथं चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. 


संबंधित बातम्या:


 IPL 2024 : आयपीएलमध्ये 17 वर्षात एकाही भारतीयाला जे जमलं नाही ते करुन दाखवलं, आशुतोष शर्मानं इतिहास रचला


Hardik Pandya : ... तर तुम्ही चाहत्यांची मनं जिंकाल, हार्दिक पांड्याला भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा कानमंत्र