Mumbai Indians मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आज वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई आयपीएल 2024 च्या बाहेर गेली आहे. लखनौ सुपर जाएंटसच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजून कायम असून त्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत. लखनौचा संघ अधिकृतपणे बाहेर गेलेला नाही. आजच्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यास प्लेऑफचं समीकरण नेमकं असेल ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 


लखनौ सुपर जाएंटसनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारला होता. त्यानंतर लखनौनं पुढील तीन सामने जिंकले होते. केएल राहुलच्या टीमला अखेरच्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौ सुपर जाएंटसनं 13 मॅच खेळल्या असून त्यांना 7 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौनं 6 मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांच्या नावावर 12 गुण आहेत. लखनौचं नेट रनरेट देखील कमी असणं हे देखील त्यांच्यासाठी अडचणीत आणणारं ठरलंय. 


लखनौचा विजय झाल्यास काय घडणार? 


लखनौ सुपर जाएंटसनं मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवल्यास त्यांच्याकडे 14 गुण होतात.  मात्र, नेट रनरेटमुळं त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाद व्हाव लागेल. दिल्ली कॅपिटल्सकडे देखील 14 गुण आहेत. दिल्लीचं नेट रनरेट देखील मायनस आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात उद्या मॅच होणार आहे. त्या मॅचच्या निकालानंतर प्लेऑफमधील चौथा संघ कोणता हे स्पष्ट होईल. 
लखनौनं आजच्या मॅचमध्ये विजय मिळवला तरी त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश  जवळपास अशक्य आहे. 


प्लेऑफमध्ये तीन संघांची एंट्री


आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये तीन संघ पोहोचले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सनं सर्वप्रथम प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यानंतर राजस्थान रॉयल्सचा क्रमांक  लागतो. राजस्थान रॉयल्सकडे 16 गुण आहेत. सनरायजर्स हैदराबादनं देखील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादकडे 15 गुण आहेत. 


मुंबईचा होम ग्राऊंडवर विजयाचा प्रयत्न


मुंबई इंडियन्स देखील यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीमधून सर्वात प्रथम बाहेर पडली आहे. मुंबईनं आतापर्यंत 13 मॅच खेळल्या असून त्यापैकी 9 मॅचमध्ये त्यांचा पराभव झालाय. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून आयपीएलचा समारोप चांगला करण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबईची टीम करेल, अशी शक्यता आहे.  


संबंधित बातम्या :


Hardik Pandya: मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, भारताच्या माजी खेळाडूनं कॅप्टन पदासाठी नवी नावं सुचवली


IPL : शाहरुख, आमीर अन् सलमान एका सिनेमात असले तरी तो हिट होईलच असं नसतं, सेहवागची मुंबईच्या कामगिरीवर टोलेबाजी