IPL 2024 Virat Kohli: विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आयपीएल 2024 च्या (IPL 2024) प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपले नशीब आजमावेल. त्याचा सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. आरसीबीचा दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. याचदरम्यान विराट कोहलीने अलीकडेच त्याची मुलगी वामिकाबद्दल एक मनोरंजक खुलासा केला आहे.
आरसीबीच्या सोशल मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहली म्हणाला की, माझ्या मुलीला हवेत बॅट स्विंग करायला आवडते. पण शेवटी तिला काय करायचे आहे हे तिने ठरवायचे आहे. विराट कोहलीने अद्याप वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला नाही. तो आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या गोपनीयतेबद्दल खूप स्ट्रीक आहे. गोपनीयतेबाबत कोहलीने सोशल मीडियावर अनेकदा पोस्टही केल्या आहेत.
भारतात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत ज्यांची मुलेही क्रिकेटर बनली आहेत. सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन, रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हे क्रिकेटपटू आहेत. अर्जुन तेंडुलकरही आयपीएल खेळला आहे. तो मुंबई इंडियन्सचा भाग राहिला आहे. मात्र आजपर्यंत त्याला अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. कोहलीची मुलगी वामिका खूप लहान आहे आणि मुलगा अकायही खूप लहान आहे. या कारणास्तव विराट कोहलीने सांगितले की, त्याला काय बनायचे आहे ते तो ठरवेल.
चेन्नई बाजी मारणार-
अनेक माजी खेळाडूंनी प्ले ऑफच्या फेरीत कोणते 4 संघ असतील, याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बंगळुरु आणि चेन्नईच्या सामन्यात चेन्नई विजयी होईल, आणि बंगळुरु प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इरफान पठाण, अंबाती रायडू, मोहम्मद कैफ, मैथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनी बंगळुरुला साथ न देता चेन्नईला साथ दिली आहे.
प्ले ऑफच्या फेरीसाठी बंगळुरुचं समीकरण कसं असेल?
आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात.
इतर बातम्या:
IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?