मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आज आमने सामने येणार आहेत. आयपीएलमधील (IPL 2024) ही 67 वी मॅच आहे. मुंबई इंडियन्सकडे आज होमग्राऊंडवर अखेरच्या मॅचमध्ये विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमधील प्रवासाचा चांगला समारोप करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर क्रिकबझशी बोलताना विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) मोठं वक्तव्य केलं. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या सुरुवातीचे चार ते पाच सामने जिंकले असते तर हार्दिक पांड्याला चाहत्यांनी स्वीकारलं असतं, सेहवागनं म्हटलं. आपल्या आवडीचा कॅप्टन नसला तरी टीम जिंकत असेल तर चाहते मान्य करतात, असं सेहवागनं म्हटलं. कोणत्याही संघाला विजयी व्हायचं असेल तर स्टार खेळाडूंनी परफॉरमन्स करावा लागेल असं त्यानं म्हटलं. सेहवागनं एक प्रकारे मुंबई इंडियन्समधील स्टार खेळाडूंना खडेबोल सुनावले.  


... तर मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला स्वीकारलं असतं


मुंबईनं सुरुवातीच्या चार पाच मॅच जिंकल्या असत्या तर हार्दिक पांड्याला चाहत्यांनी स्वीकारलं असतं. मुंबईची टीम जिंकावी असं चाहत्यांना वाटत असतं. आपला आवडता कप्तान नसला तरी टीम जिंकली असती तर चाहत्यांनी ते मान्य केलं असतं, असं विरेंद्र सेहवागनं म्हटलं. कप्तान कोणी असलं तरी टीम जिंकत असल्यास चाहत्यांची मनं बदलली असतं, विरेंद्र सेहवागनं म्हटलं. मुंबईच्या टीमनं चार मॅच पहिल्यांदा जिंकल्या असत्या तर हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांनी स्वीकारलं असतं, असं सेहवागनं म्हटलं. 


विरेंद्र सेहवागनं पुढे म्हटलं की, तुम्ही शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खानला एका पिक्चरमध्ये आणल्यास तो हिट होईलचं असं नाही. स्टार असले तरी त्यांना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, स्क्रिप्ट लागेल असं सेहवागनं म्हटलं. मुंबईकडील मोठी नावं आहेत त्यांना चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल. रोहित शर्मानं एक शतक केलं दुसऱ्या मॅचमध्ये काय केलं. ईशान किशन पूर्ण सीझन झाला तरी पॉवर प्लेच्या पुढं जाऊ शकला नाही, असं सेहवागनं म्हटलं.


मुंबई इंडियन्समधील स्टार खेळाडूंना परफॉर्मन्स द्यावा लागेल, असंही सेहवागनं म्हटलं. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या दोघांना रिटेन करावं असं सेहवाग म्हणाला.  


दरम्यान, मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये 13 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर, त्यांना 9 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.


संबंधित बातम्या : 


Hardik Pandya: मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, भारताच्या माजी खेळाडूनं कॅप्टन पदासाठी नवी नावं सुचवली


ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर