IPL 2024: KKR vs RR: आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals: कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

मुकेश चव्हाण Last Updated: 16 Apr 2024 11:37 PM
राजस्थानचा विजय

जोस बटलरच्या झंझावती शतकाच्या बळावर राजस्थाननं 2 विकेटनं विजय मिळवला. 

जोस बटलरचं वादळी शतक

225 धावांचा पाठलाग करताना जोस बटलरनं वादळी शतक ठोकलं.  

राजस्थानला आणखी एक धक्का

ट्रेंट बोल्ट बाद झाला.. राजस्थानला आठवा धक्का

राजस्थानला मोठा धक्का

पॉवेलच्या रुपाने राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. पॉवेल 13 चेंडूत 26 धावा काढून बाद झालाय. नारायणनं घेतली विकेट

राजस्थानचा हल्लाबोल

पॉवेल-बटलरकडून वादळी फलंदाजी सुरु... सामना रोमांचक स्थितीमध्ये

जोस बटलरचं अर्धशतक

जोस बटलरनं अर्धशतक ठोकलेय. राजस्थान सहा बाद 136 धावा

कोलकात्याची 223 धावांपर्यंत मजल

सुनील नारायणच्या शतकाच्या बळावर कोलकात्यानं 223 धावांपर्यंत मजल मारली.

कोलकात्याला सहावा धक्का

वेंकटेश अय्यरच्या रुपाने कोलकात्याला सहावा धक्का.. 

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत

सुनील नारायण 56 चेंडूमध्ये 109 धावा काढून बाद झाला. बोल्टनं नाराय़णचा काढला बोल्ड

कोलकात्याला चौथा धक्का

आंद्रे रसेलच्या रुपाने कोलक्याला चौथा धक्का बसलाय. 

नारायण राणेचं वादळी शतक

सुनील नारायण यानं 49 चेंडूमध्ये शतक ठोकलेय. राजस्थानची गोलंदाजी फोडली

कोलकात्याला तिसरा दक्का

श्रेयस अय्यरच्या रुपाने कोलकात्याला तिसरा धक्का बसलाय

कोलकात्याला दुसरा धक्का

रघुवंशी बाद झाल्यामुळे कोलकात्याला दुसरा धक्का बसलाय

सुनील नारायणचं अर्धशतक

सुनील नारायण यानं वादळी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. नारायण यानं 31 चेंडूत ठोकलं अर्धशतक

कोलकात्याची वादळी सुरुवात

प्रथम फंलदाजी करणाऱ्या कोलकात्यानं वादळी सुरुवात केली आहे. फिलीप सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी कोलकात्याला वादळी सुरुवात करुन दिली. साल्ट 10 धावा काढून बाद झालाय. नारायण 23 तर रघुवंशी 20 धावांवर खेळत आहे. कोलकाता 6.4 षटकात एक बाद 62 धावा

राजस्थाननं नाणेफेक जिंकली

संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्सचं

हेड टू हेड

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळले गेले आहेत. कोलकाताने 14 सामने जिंकले तर राजस्थानने 13 सामने जिंकले. तर एक सामना अनिर्णित राहिला. कोलकातामध्ये दोन्ही संघांमध्ये 10 सामने झाले. कोलकाताने 6 आणि राजस्थानने 3 जिंकले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

खेळपट्टी कशी असेल?

इडन गार्डन्स स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळते. मात्र फिरकीपटूंना देखील या मैदानावर मदत मिळते. या मैदानावर आतापर्यंत 88 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 36 सामने जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 52 सामने जिंकले आहेत.

राजस्थानची संभाव्य Playing XI

संजू सॅमसन (कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल/जोस बटलर, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

केकेआरची संभाव्य Playing XI

फिल सॉल्ट, सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थानचा संपूर्ण संघ-

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, आवेश खान, शुभम दुबे, रोवमॅन पोवेल, नांद्रे बर्गर

केकेआरचा संपूर्ण संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमनुल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रुदरफोर्ड, मनिष पांडे, मुजीब उर रहमान, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन

केकेआरचं ट्विट

पार्श्वभूमी

IPL 2024: KKR vs RR: आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.