IPL 2024 : आयपीएल 2024 सध्या अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धा जसजशी पुढे जातेय, तसेतसे प्लेऑफचं गणित बदलत चाललेय. यंदाच्या हंगामात फलंदाजांचा बोलबाला दिसला. पण या फलंदाजांच्या विस्फोटक खेळीमध्येही गोलंदाजांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे. सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम हर्षल पटेल याच्या नावावर जमा झालाय. हर्षल पटेल यानं जसप्रीत बुमराहच्या डोक्यावरुन पर्पल कॅप हिसकावली आहे. तर फलंदाजात विराट कोहलीने आपला दावा अधिक मजबूत केलाय. विराट कोहलीने 600 धावांचा पल्ला पार केला.


ऑरेंज कॅप विराटकडेच, दावा अधिक मजबूत  


विराट कोहलीने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. विराट कोहलीने 12 सामन्यात 634 धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 154 च्या स्ट्राईक रेटने आणि 71 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. त्याशिवाय विराट कोहलीने 30 षटकार आणि 55 चौकार ठोकले आहेत. विराट कोहलीने आजच्या सामन्यात 92 धावांची खेळी करत ऑरेंज कॅपवरील दावा मजबूत केला आहे. विराट कोहली 634 धावांचा पाऊस पाडलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 11 सामन्यात 541 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हेडच्या नावावर 533, संजूच्या नावावर 471 धावा आहेत. नारायण पाचव्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर 461 धावा आहेत.






पर्पल कॅपवर हर्षल पटेलचा दावा


आरसीबीविरोधात हर्षल पटेल यानं भेदक मारा केला. त्यानं अखेरच्या षटकात फक्त तीन धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. हर्षल पटेल यानं आरसीबीच्या तीन फलंदाजांना बाद करत पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. हर्षल पटेल यानं जसप्रीत बुमराह याच्याकडून पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. हर्षल पटेल यानं 12 सामन्यात 20 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्ती याच्या नावावर 16 विकेट आहेत. अर्शदीप सिंह याच्याकडेही 16 विकेट आहेत. नटराजन 15 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे. मुकेश कुमार 15 तर नारायणच्या नावावर 14 विकेट आहेत.