IPL 2024 Points Table Update : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 52 वी मॅच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि रॉयल चॅलेंचर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात पार पडली. या मॅचमध्ये आरसीबीनं 4 विकेट राखून गुजरातवर विजय मिळवला.  आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत (IPL Points Table) मोठा उलटफेर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चार मॅचमध्ये विजय मिळवत 8 गुणांसह सातव्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे आरसीबीच्या विजयामुळं मुंबई इंडियन्सला मात्र मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईनं केवळ तीन मॅच जिंकल्या असून 6 गुणांसह ते दहाव्या स्थानावर आहेत. 

आरसीबीची मोठी झेप

गुजरात टायटन्स विरुद्धची मॅच सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होता. आरसीबीनं गुजरातला 147 धावांवर रोखलं होतं. आरसीबीनं विजयासह नेट रनरेटच्या आधारे गुणतालिकेत मोठी झेप घेण्यासाठी आक्रमक सुरुवात केली होती. त्यानुसार आरसीबीनं थोडीशी पडझड होऊन देखील विजय मिळवला. आरसीबीचा संघ आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. आरसीबीच्या अजून तीन मॅच बाकी आहेत. त्या मॅचेसमध्ये आरसीबीला विजय मिळतो का ते पाहावं लागेल. आरसीबीची शेवटची लढत 18 मे रोजी होणार आहे. 

गुजरातचा पराभव आणि गुणतालिकेत घसरण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर गुजरातचा संघ गुणतालिकेत देखील घसरला आहे. गुजरातच्या संघानं 11 मॅच खेळल्या असून त्यापैकी 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळं  त्यांच्या संघाकडे देखील आठ गुण आहेत. मात्र, नेट रनरेट कमी असल्यानं गुजरातचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. 

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी देखील यंदा निराशाजनक राहिलेली आहे. मुंबईनं खेळलेल्या 11 मॅचपैकी 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तीन सामन्यातील विजयाच्या जोरावर 6 गुण त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळं मुंबई इंडियन्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर घसरलं आहे. 

गुणतालिकेत टॉपवर कोण? 

राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स 14 गुण, लखनौ सुपर जाएंटस 12 गुण, सनरायजर्स हैदराबाद 12 गुणांसह टॉप फोरमध्ये आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

दरम्यान, मुंबईच्या अजून तीन मॅच शिल्लक आहेत. या मॅचेसमध्ये मुंबई इंडियन्स विजय मिळवत यंदाच्या आयपीएलचा शेवट सन्मानजनक करण्याचा प्रयत्न असेल. 

गुणतालिका :

क्र. संघ मॅच विजय टाय पराभव गुण नेट रनरेट
1. राजस्थान रॉयल्स 10 8 0 2 16 0.622
2.
कोलकाता नाईट रायडर्स
10 7 0 3 14 1.098
3.
लखनौ सुपर जाएंटस
10 6 0 4 12 0.094
4. सनरायजर्स हैदराबाद 10 6 0 4 12 0.072
5. चेन्नई सुपर किंग्ज 10 5 0 5 10 0.627
6.
दिल्ली कॅपिटल्स
11 5 0 6 10 -0.442
7. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 11 4 0 7 8 -0.049
8. पंजाब किंग्ज 10 4 0 6 8 -0.062
9. गुजरात टायटन्स 11 4 0 7 8 -1.320
10. मुंबई इंडियन्स 11 3 0 8 6 -0.356

संबंधित बातम्या :

MS Dhoni: "क्रिकेटमध्ये धोनी माझ्यासाठी वडिलांची भूमिका बजावतो",चेन्नईच्या युवा खेळाडूनं सर्वांची मनं जिंकली

GT vs RCB : 1,2,6, गुजरात टायटन्सची टॉप ऑर्डर पुन्हा फेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा धमाका