IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders:  मुंबई इंडियन्स (MI) आणि  कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात काल झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने 24 धावांनी मुंबईचा पराभव केला. या पराभवामुळे मुंबईचं यंदाच्या हंगामातील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्यानं दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 145 धावाच करता आल्या.


मुंबई आणि कोलकाताच्या सामन्यातील हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या वेगळ्याच तणावात दिसून येत आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी हार्दिक गोलंदाजी करत होता. एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी पाठवताना हा प्रकार घडला.


बुमराहच्या चेहऱ्यावर दिसली निराशा-


हार्दिक पांड्या जेव्हा जसप्रीत बुमराहला ओरडला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. बुमराह पूर्णपणे निराश दिसत होता. बुमराह हसत हसत दुसरीकडे पाहू लागला. ही घटना कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या 17 व्या षटकात घडली. 






मुंबईचा सलग चौथा पराभव


आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने सलग चौथा सामना गमावला आहे. हार्दिकच्या संघानेही सलग 3 पराभवांसह लीगची सुरुवात केली. केकेआरविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. केकेआरच्या 57 धावांत 5 विकेट पडल्यानंतरही त्याने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली नाही. यावेळी बुमराहची 3 षटके बाकी होती. याचाच फायदा केकेआरच्या व्यंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांनी घेतला. 


इरफान पठाणची टीका-


मुंबईच्या या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) प्रश्न उपस्थित केला आहे. इरफान पठाण ट्विट करत म्हणाला, समालोचन करत असताना मी सामन्यादरम्यान एक प्रश्न उपस्थित केला होता. नमन धीरकडून गोलंदाजी करण्याचं कारण काय? जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने 57 वर 5 विकेट्स गमवले आहेत. का?, असं इरफान पठाण म्हणाला. तसेच वानखेडेवर इतका कमी स्कोअर असूनही कोलकात्याने काय विजय मिळवला, असं अभिनंदन करणारं ट्विट करत इरफान पठाणने मुंबईच्या जखमेवर मीठंही चोळलं. 


संबंधित बातम्या:


Rohit Sharma: कोलकाताविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी


आयपीएलनंतर टी-20 विश्वचषकाचा थरार; विजेता संघ होणार मालामाल, पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस


मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल