IPL 2024 GT vs RCB: विराटचं अर्धशतक, विल जॅक्सचं शतक, आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय

IPL 2024 GT vs RCB: गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल.

मुकेश चव्हाण Last Updated: 28 Apr 2024 06:55 PM
आरसीबीनं विजयाचा गुलाल उधळला, गुजरातला पराभवाचा धक्का

आरसीबीनं विराट कोहली आणि विल जॅक्सच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 9 विकेटनं विजय मिळवला आहे. 

विराट कोहली आणि विल जॅक्सची 100 धावांची भागिदारी

आरसीबीचे फलंदाज विराट कोहली आणि विल जॅक्स यांनी शतकी भागिदारी केली. तर, विल जॅक्सनं अर्धशतक केलं.

RCB vs GT : आरसीबीला पहिला धक्का, फाफ डु प्लेसिस 24 धावांवर बाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे. फाफ डु प्लेसिस 24 धावा करुन बाद झाला आहे. 

साई सुदर्शन, शाहरुख खानची खेळी गेमचेंजर, 20 ओव्हरमध्ये 200 धावा

गुजरात टायटन्सनं साई सुदर्शन आणि शाहरुख खानच्या अर्धशतकांच्या जोरावर 200 धावांचा टप्पा पार केला आहे. 

गुजरात टायटन्सचा 150 धावांचा टप्पा पार

गुजरात टायटन्सनं 150 धावांचा टप्पा पार केला आहे. साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर  गुजरातनं सतराव्या ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पा पार केला. 

GT vs RCB : शाहरुख खान अर्धशतकी खेळीनंतर बाद

गुजरात टायटन्सचा डाव साई सुदर्शन आणि शाहरुख खान या दोघांनी सावरला. दोघांनी अर्धशतक केलं. शाहरुख खान 58 धावांवर बाद झाला. 

गुजरातचं कमबॅक, शंभर धावा पूर्ण

 शाहरुख खान आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातचा डाव सावरला. गुजरातनं 12 व्या ओवरमध्ये शंभर धावा पूर्ण केल्या. 

गुजरात टायटन्सला दुसरा धक्का, शुभमन गिल 16 धावांवर बाद
गुजरात टायटन्सला दुसरा धक्का  बसला असून शुभमन गिल 16 धावांवर बाद  झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर मोठा फटका मारताना गिल बाद झाला.  

 

GT vs RCB : गुजरात टायटन्सला पहिला धक्का, रिद्धिमान साहा 5 धावांवर बाद

गुजरात टायटन्सला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला आहे. रिद्धिमान साहा 5 धावा करुन बाद झाला. 

गुजरातची Playing XI:

रिद्धिमान साहा (W), शुभमन गिल (C), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा

आरसीबीची Playing XI:

विराट कोहली, फाफ ड्यु प्लेसीस (C), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (W), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल

आरसीबीचा गोलंदाजीचा निर्णय

आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात

गुजरातचं ट्विट

विराट कोहली अन् राशिद खानची भेट

आरसीबीचं ट्विट

दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण

गुजरात टायटन्सची संभाव्य Playing XI

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची संभाव्य Playing XI

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल

कोणचं वर्चस्व?

आयपीएलमध्ये आतापर्यंत बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एकूण 3 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे, तर बेंगळुरूला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. अशा स्थितीत आज बेंगळुरूला हा विक्रम 2-2 असा बरोबरीत ठेवायचा आहे आणि गुजरातला आघाडी कायम ठेवायची आहे.

खेळपट्टी कशी असेल?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आतापर्यंत गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. तर उर्वरित मैदानावर 200 पेक्षा जास्त धावसंख्या झाल्यानंतर पाठलाग केला जातो. येथे एकूण 180-190 च्या आसपास धावा केल्यास प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली येऊ शकतो. प्रथम फलंदाजी करणे येथील संघांसाठी अधिक फायदेशीर ठरते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

रिद्धिमान साहा(w), शुभमन गिल(c), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, साई सुधरसन, शरथ बीआर, मानव सुथार, विजय शंकर, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संपूर्ण संघ

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (c), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (w), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत , हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रीस टोपले, टॉम कुरन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार

पार्श्वभूमी

IPL 2024 Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru: आज गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजत या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.