GT vs DC Live Score IPL 2024 : गुजरातला होम ग्राऊंडवरील पराभवाचा वचपा काढण्याची संधी, दिल्ली विजयाच्या मार्गावर परतणार?

GT vs DC Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. आयपीएलमधील ही 40 वी लढत आहे.

युवराज जाधव Last Updated: 24 Apr 2024 11:25 PM
दिल्लीचा चार धावांनी विजय

दिल्लीचा चार धावांनी विजय

गुजरातला आठवा धक्का

साई किशोर 6 चेंडूमध्ये 13 धावा काढून बाद झाला. गुजरातला आठवा धक्का बसलाय. गुजरातला अखेरच्या षटकात 19 धावांची गरज.. राशीद खानवर सर्व मदार

सामना रोमांचक स्थितीमध्ये

गुजरातला विजयासाठी 11 चेंडूमध्ये 32 धावांची गरज.. दिल्लीला तीन विकेटची गरज

गुजरातला मोठा धक्का

डेविड मिलर 55 धावांवर बाद... गुजरातला सातवा धक्का

डेविड मिलरचं शानदार अर्धशतक

 


मिलर यानं 21 चेंडूत ठोकलं अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

गुजरातला सहावा धक्का

गुजरातला सहावा धक्का.. राहुल तेवातिया बाद

गुजरातचा अर्धा संघ तंबूत

शाहरुख खानच्या रुपाने गुजरातला पाचवा धक्का बसला

गुजरातला चौथा धक्का

रसिख शेखनं गुजरातला दिला चौथा धक्का.. साई सुदर्शन बाद

साई सुदर्शनचं शानदार अर्धशतक

गुजरातची कडवी झुंज. साई सुदर्शनचं शानदार अर्धशतक.. गुजरात 3 बाद 119 धावा

पंतची वादळी फलंदाजी

दिल्लीने निर्धारित 20 षटकात 224 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकात पंतने 31 धावा वसूल केल्या. गुजरातला विजयासाठी 225 धावांचे आव्हान

ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक

 


ऋषभ पंत यानं 34 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. दिल्ली भक्कम स्थितीमध्ये

दिल्लीला चौथा धक्का

अक्षर पटेलच्या रुपाने दिल्लीला चौथा धक्का बसलाय. षटकार मारण्याच्या नादात अक्षर पटेल बाद झालाय. 

अक्षर पटेलचं अर्धशतक

अक्षर पटेलनं शानदार अर्धशतक ठोकलं. पंतची झंझावती फलंदाजी.. दिल्ली 3 बाद 143 धावा

दिल्लीचा डाव सावरला

पंत आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. दोघांनी दिल्लीचा डाव सावरलाय. दिल्ली 3 बाद 97 धावा

दिल्लीला आणखी एक धक्का

शाय होप फक्त पाच धावा काढून तंबूत परतला. दिल्लीला तिसरा धक्का.. सर्व मदार कर्णधार ऋषभ पंत याच्यावर

एकाच षटकात दिल्लीना दोन धक्के

दिल्लीचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले आहेत. जैक 23 धावा काढून माघारी परतला.  तर पृथ्वी शॉ 11 धावा काढून बाद

गुजरातचे 11 शिलेदार कोणते ?

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, अजमुत्तालाह ओमरजई, डेविड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवातिया, आर. साई किशोर, राशीद खान, नूर अमहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर


इम्पॅक्ट सब - शरथ, विजय शंकर, सुतार, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे

दिल्लीच्या ताफ्यात कोण कोण ?

पृथ्वी शॉ, जेक प्रेसर मॅकगर्क, शाय होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, खलील अहमद


इम्पॅक्ट सब - सुमित कुमार, रासीख, कुमार कुशाग्र, दुबे, ललित यादव

गुणतालिकेत दोन्ही संघ कुठे ?

गुजरातने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. शुभमन गिलच्या गुजरातकडे आठ गुण आहेत. गुजरातचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्लीने आठ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. सहा गुणांसह दिल्लीचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि गुजरातसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा विजय महत्वाचा आहे.  

गुजरातने नाणेफेक जिंकली

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.

DC vs GT : शुभमन गिल आज शंभरावा आयपीएल सामन खेळणार

गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल आज 100 वा आयपीएल सामना खेळणार आहे. 

DC vs GT : गुजरात अन् दिल्लीच्या मॅचचा पिच रिपोर्ट

अरुण जेटली स्टेडियमवरील पिचवर स्विंग आणि सीम मुव्हमेंट वेगवान गोलंदाजांना मिळत नाही. त्यामुळं वेगवान गोलंदाजांना अधिक मेहनत करावी लागेल. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

गुजरातचं पंजाब किंग्जवर विजय मिळवत कमबॅक

गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात पराभव झाल्यानंतर पुढील मॅचमध्ये पंजाब किंग्जला पराभूत केलं. 

GT vs DC : दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सला पुन्हा पराभूत करणार?

 दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभव केला होता. आज दिल्लीकडे पुन्हा एकदा तशी कामगिरी करण्याची संधी आहे.

गुजरात की दिल्ली कोण कुणाला वरचढ?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यापूर्वी चार वेळा आमने सामने आले आहेत. गुजरातनं दोन तर  दिल्लीनं दोन मॅच जिंकल्या आहेत.

DC vs GT : दिल्ली कॅपिटल्सचा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न

दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला पराभूत केल्यानंतर पुढील मॅचमध्ये त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आज त्यांना पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्याची संधी आहे.

पार्श्वभूमी

GT vs DC, IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Live : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलमधील 40 वी लढत होणार आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही दिवसांपूर्वी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातचा पराभव केला होता. गुजरात टायटन्सनला दिल्लीनं 89 धावांवर बाद केलं होतं. आज दिल्ली कॅपिटल्स  आणि गुजरात पुन्हा आमने सामने येत आहेत. रिषभ पंतच्या नेतृत्त्वात दिल्लीला कम बॅकरण्याची संधी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.