Virendra Sehwag Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग तिसरा पराभव झाला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. 


पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईची स्थिती सध्या ठीक नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ताफ्यातील वातावरणही ठीक नसल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या एकटा पडल्याचे अनेक प्रसंगावरुन दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला हूटिंग केले जात आहे. हार्दिक पांड्याला जोरदार हूटिंग केलं जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने हार्दिक पांड्याला मोलाचा सल्ला दिला आहे. 


'क्रिकबझ'वर सामन्याचे विश्लेषण करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई होत असताना जमप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली. पण, 13 षटकांपर्यंत त्याने दुसरे षटक टाकले नव्हते. हे सर्वकाही कर्णधारावर अवलंबून असते. माजी कर्णधार रोहित शर्माने जमप्रीत बुमराहचा चांगल्या प्रकारे वापर केला. जमप्रीत बुमराहला कधी आणि केव्हा गोलंदाजीसाठी आणायचे, हे रोहित शर्माला माहिती होते.  ही गोष्ट हार्दिक पांड्याने रोहित शर्माकडून शिकायला हवी, असा सल्ला वीरेंद्र सेहवागने हार्दिक पांड्याला दिला आहे.


मुंबईचा राजा रोहित शर्मा...


हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपवल्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. त्यांच्या रोषाचा सामना हार्दिक पांड्याला करावा लागतोय. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग केले जाते. वानखेडे मैदानावरही हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यासमोर रोहित रोहित, मुंबईचा राजा रोहित शर्मा... अशी घोषणाबाजी केली जाते. 


मुंबईचा संघ तळाशी - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. 






संबंधित बातम्या:


18 वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीला अस्मान दाखवलं; आई-वडिलांनी केलंय भारताचं प्रतिनिधित्व


DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुन खानचं होतंय कौतुक,Video


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos