Juhi Chawla on Shah Rukh Khan  : शाहरुख खान (Shah Rukh Khan), जुही चावला (Juhu Chawla) आणि तिचा नवरा जय मेहता (Jay Mehta) हे आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (kolkata Knight Riders) या संघाचे मालक आहेत. जेव्हा केकेआरची मॅच असते, तेव्हा शाहरुख त्याच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी कायम मैदानावर दिसतो. आयपीएल 2024 मध्येही शाहरुख आतापर्यंत झालेल्या कोलकाताच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहचला होता. पण एका संघाचे मालक असूनही जुही चावला शाहरुखसोबत कधीही मैदानावर मॅच पाहताना दिसत नाही. 


दरम्यान जुही चावलाला ते फारसं आवडत नाही, असं देखील तिच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाल्याचं म्हटलं जात आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून जुही चावला आणि शाहरुख यांनी एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांना देखील तितकीच भावते. पण आयपीएलच्या सामन्यात मात्र ही जोडी कधीच एकत्र पाहायला मिळत नाही. यासंदर्भात नुकतच जुही चावलाने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. 


तो सगळा राग माझ्यावर काढतो - जुही चावला


न्यूज 18ने दिलेल्या रिपोर्टनुसार, जुही चावलाने एका कार्यक्रमादरम्यान यावर भाष्य केलं आहे. तिनं म्हटलं की, जेव्हा आमची टीम परफॉर्मन्स चांगला करत नाही, तेव्हा शाहरुखसोबत मॅच पाहणं खरचं कठिण असतं. कारण तेव्हा तो त्याचा सगळा राग माझ्यावर काढतो. मी त्याला म्हणते देखील की तू हे सगळं मला नाही, तर टीमला जाऊन सांग. त्यामुळे आम्ही एकत्र मॅच पाहूच शकत नाही. मला असं वाटतं की, इतर संघाच्या मालकांसोबतही असंच होत असेल. 


टीमला खेळताना पाहणं खरंच भारी असतं - जुही चावला


जुहीने पुढे बोलताना म्हटलं की, जेव्हा आमची टीम खेळत असते, तेव्हा ते पाहणं खरचं खूप भारी असतं. आम्ही देखील तेव्हा खूप तणावात असतो. आम्ही पूर्णवेळ तेव्हा टीव्हीसमोर बसून असतो. 


जुही चावला आणि शाहरुखची केमिस्ट्री


जुही जरी शाहरुखसोबत मॅच पाहत नसली, तर त्यांची मैत्री फार जुनी आहे. जुहीने शाहरुखसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अभिनेत्याचा मुलगा आर्यनच्याही ती खूप जवळ आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जेव्हा अटक करण्यात आली त्यावेळी जुहीनेच त्याच्या जामीनाची रक्कम भरली होती आणि त्यावर स्वाक्षरी देखील केली होती. त्याचबरोबर शाहरुखने जूही चावलाला तिच्या अनेक कठीण प्रसंगात साथ दिली आहे. 


ही बातमी वाचा : 


Vikrant Massey : 'बालिका वधू'चा श्याम कसा झाला '12 वी फेल'चा IPS मनोज शर्मा; वाचा विक्रांत मेस्सीची स्ट्रगल स्टोरी