IPL 2024 Final KKR vs SRH: केकेआरने आयपीएलच्या चषकावर तिसऱ्यांदा नाव कोरलं, सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव

IPL 2024 Final KKR vs SRH: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. चेन्नईतील चेपॉक मैदानावर हा सामना रंगेल.

मुकेश चव्हाण Last Updated: 26 May 2024 10:25 PM
कोलकात्याचा विजय, तिसऱ्यांदा चषकावर कोरलं नाव

कोलकात्याचा विजय, तिसऱ्यांदा चषकावर कोरलं नाव


 


कोलकात्याने हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. 

हैदराबादचा डाव 113 धावांवर संपुष्टात

हैदराबादचा डाव 113 धावांवर संपुष्टात.. चषकासाठी कोलकात्याला 114 धावांचे आव्हान

हैदराबादला नववा धक्का

जयदेव उनादकटच्या रुपाने हैदराबादला नववा धक्का बसलाय. जयदेव उनादकट 4 धावा काढून बाद झालाय. 

कोलकात्यासमोर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली

हैदराबादची बलाढ्य फलंदाजी कोलकात्यासमोर ढेपाळली. 90 धावांमध्ये हैदराबादचे आठ फलंदाज बाद झालेत. 

हैदराबादची दाणादाण

70 धावातच हैदराबादचे 7 जण बाद... क्लासेनवर सर्व मदार

हैदराबादला चौथा धक्का

हर्षित राणाच्या चेंडूवर नीतीश रेड्डी बाद झालाय. रेड्डी 13 धावा काढून बाद झालाय. हैदराबाद 7 षटकानंतर 4 बाद 47 धावा

माक्ररम अन् रेड्डीने डाव सावरला

आघाडीचे तीन फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतल्यानंतर अनुभवी एडन माक्ररम यानं रेड्डीच्या साथीने हैदराबादचा डाव सावरलाय. दोघांमध्ये 25 धावांची भागिदारी झाली आहे. रेड्डी 13 तर माक्ररम 15 धावांवर खेळत आहे. हैदराबाद 3 बाद 46 धावा

हैदराबादला तिसरा धक्का

पाचव्या षटकात हैदराबादला तिसरा धक्का बसलाय. मिचेल स्टार्कने राहुल त्रिपाठीचा अडथळा दूर केला. हैदराबाद 3 बाद 21 धावा

हैदराबादला दुसरा धक्का

वैभव अरोरा याने ट्रेविस हेडला शून्यावर तंबूत धाडले. हैदराबादला दोन षटकात दोन धक्के....

स्टार्कचा भेदक मारा

 


मिचेल स्टार्क यानं पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफाळा उडवला. अभिषेक शर्मा फक्त दोन धावा काढून बाद झाला.

मोठी धावसंख्या उभारु, हेडचा विश्वास

केकेआरची इलेव्हन

 


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.


इम्पॅक्ट प्लेअर - अनुकुल रॉय, मनिष पांडे, नितीश राणा, केएस भरत शरफन रुदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबादची इलेव्हन


ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी,शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि जयदेव उनादकट

हैदराबादने नाणेफेक जिंकली

पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार

IPL 2024 Final KKR vs SRH: नरेन, चक्रवर्ती, रसेल, रिंकू, स्टार्क अंतिम लढाईसाठी तयार

IPL 2024 Final KKR vs SRH: चेपॉकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी कोलकाता सज्ज

IPL 2024 Final KKR vs SRH: केकेआरचा अष्टपैलू सुनील नरेनचा आज वाढदिवस

IPL 2024 Final KKR vs SRH: अंतिम सामन्यासठी हैदराबादचा संघ सज्ज

पॅट कमिन्सचा आयपीएलच्या ट्रॉफीवर डोळा!

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य इलेव्हन

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन.

केकेआरची संभाव्य इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

IPL 2024 Final KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेता कोण?

IPL 2024 Final KKR vs SRH: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. यावेळी पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण झाला. त्याप्रमाणे या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना किमान 5 षटकांचा करण्याचा प्रयत्न केला जाईल. 5 षटकांचा सामना न खेळल्यास सुपर ओव्हरद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो. पावसामुळे सुपर ओव्हरचा खेळही न झाल्यास गुणतालिकेतील क्रमाच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

केकेआरचा पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश

कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हैदराबादने दुसरा क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. मागील हंगामात म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले नव्हते.

कोलकाता अन् हैदराबादसाठी खास व्हिडीओ

जेतेपद कोण पटकावणार?

आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा विजेता कोण हे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर ठरणार आहे. एमए. चिदंबरम स्टेडियममध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीम आपआपल्या बेस्ट खेळाडूंसह मैदानात उतरतील.

पार्श्वभूमी

IPL 2024 Final Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना आज रंगणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.