IPL 2024 : भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) मधील सर्व सामने फक्त भारतातच आयोजित केले जाणर आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेंमींना भारतीय स्टेडियममध्ये आयपीएलचा आनंद लुटता येणार आहे. यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवला जाईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (BCCI) जय शाह यांनी या अफवांना पूर्णविराम दिल आहे. 


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी एका मुलाखतीत इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) (आयपीएल) परदेशात स्थलांतरित होणार नाही, हे स्पष्ट केले. भारतात सार्वत्रिक निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा शनिवारी (दि.16) जाहीर झाल्या. निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आयपीएल स्थलांतरित होणार नाही.


परदेशात सामने होणार नाहीत


"आयपीएल (IPL 2024) परदेशात नेले जाणार नाही," असं जय शाह क्रिकबझशी बोलताना म्हणाले आहेत. भारतात 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. 22 मार्च रोजी चेन्नई येथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होईल. आतापर्यंत पहिल्या दोन आठवड्यांत कोणते सामने खेळवले जाणार याबाबचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 


19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशात निवडणूक 


आयपीएलचे (IPL 2024) अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी शनिवारी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे (IPL 2024) यूएईमध्ये हलवली जाईल, ही माहिती फेटाळून लावली आहे.  निवडणुकांमुळे आयपीएल (IPL 2024) यूएईमध्ये हलवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 


उर्वरित कार्यक्रम लवकरच जाहीर करू


सोशल मीडियावर अशा बातम्या आहेत. खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट संबंधित फ्रँचायझीकडे जमा करण्यास सांगितले जात आहे. धुमल यांनी पीटीआयला सांगितले की, "आयपीएल (IPL 2024) कुठेही हलवले जात नाही. उर्वरित कार्यक्रम लवकरच जाहीर करू." हिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे, ज्यामध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना 22 मार्च रोजी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे.






 


इतर महत्वाच्या बातम्या


शाहीन मुंबईत, बाबर आरसीबीमध्ये तर रिझवान चेन्नईत... पाकिस्तानी चाहत्याला भज्जीनं दिलं सडेतोड उत्तर