MIW vs RCBW Match Report : स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीनं फायनलमध्ये धडक मारली आहे. एलिमेटनरच्या सामन्यात आरसीबीनं हरमनप्रीत कौरच्या मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. रविवारी दिल्लीच्या मैदानावर आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अटीतटीच्या सामन्यात आज आरसीबीनं मुंबईचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता.
आरसीबीनं मुंबईपुढे विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 130 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अखेरच्या तीन षटकात आरसीबीने सामना फिरवला. या विजयासह आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईच्या फलंदाजांची ढिसाळ कामगिरी -
मुंबई इंडियन्सनं सामन्यावर पकड मिळवली होती. पण अखेरच्या तीन षटकात हराकिरी केली. हरमप्रीत कौरनं मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. मुंबईकडून हरमनप्रीत कौर हिनं सर्वाधिक 33 धावांचं योगदान दिलं. अमेलिया कैर हिनं नाबाद 27 धावांचं योगदान दिलं. त्याशिवाय नेट सीवर ब्रंट हिने 23 धावा जोडल्या. त्याआधी सलामी फलंदाज यास्तिका भाटिया आणि हॅली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी 27 धावांची भागिदारी केली. हॅली मॅथ्यूज 15 धवांकडून बाद झाली. तर यास्तिका भाटिया 19 धावा काढून एलिस पॅरीच्या चेंडूवर बाद झाली.
आरसीबीकडून श्रेयंका पाटील हिने सर्वाधिक भेदक मारा केला. तिनं 2 विकेट घेतल्या. त्याशिवाय एलिस पैरी, सोफी मोलेनिक्स, जॉर्जिया वेयरहम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
आरसीबीकडून 135 धावांपर्यंत मजल -
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीनं निर्धारित 20 षटकात 135 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली होती. आरसीबीनं ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. स्मृती मंधाना आणि सोफिया डिवाइन यांनी खराब सुरुवात दिली. त्याशिवाय ऋचा घोषही स्वस्तात तंबूत परतली. पण एलिस पैरी हिने आसीबीचा डाव सावरला. एलिस पैरी हिने 50 चेंडूवर 66 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता. जॉर्जिया वेयरहम हिने अखेरच्या षटकात झटपट धावा काढल्या, तिने 10 चेंडूत 18 धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. ठरावीक अंतराने आरबीसीच्य फलंदाजांन बाद केले, त्याशिवाय धावाही रोखल्या. मुंबईकडून हॅली मॅथ्यूज, नेट सीवर ब्रंट आणि साइका इशाक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.