IPL 2024 DC vs MI: दिल्ली आणि मुंबई यांच्यात लढत, सामन्याचा संक्षिप्त आढावा

IPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians: दिल्ली आणि मुंबईसाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. 

मुकेश चव्हाण Last Updated: 27 Apr 2024 07:39 PM
दिल्लीचा विजय

DC vs MI, IPL 2024 :  अटीतटीच्या सामन्यात दिल्लीनं मुंबईचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली.  

तिलक वर्मा धावबाद

मोक्याच्या क्षणी दोन धावा घेण्याच्या नादात तिलक वर्मा धावबाद झाला. 

मुंबईला सातवा धक्का

मोहम्मद नबीच्या रुपाने मुंबईला सातवा धक्का बसलाय. नबीने 4 चेंडूमध्ये सात धावांची खेळी केली. मुंबईला नऊ चेंडूमध्ये 35 धावांची गरज

मुंबईला सहावा धक्का

टीम डेविड 17 चेंडूत 37 धावा काढून बाद झालाय.

तिलक वर्माचं अर्धशतक

तिलक वर्मानं अर्धशतक ठोकत जोरदार झुंज दिली. मुंबईला विजयासाठी 28 चेंडूत 80 धावांची गरज

मुंबईला लागोपाठ दोन झटके

कर्णधार हार्दिक पांड्या माघारी परतल्यानंतर मुंबईला आणखी एक धक्का बसला आहे. नेहाल वढेरा 4 धावा काढून बाद झाला. 

हार्दिक पांड्याचं अर्धशतक हुकलं

चार धावांनी हार्दिक पांड्याचं अर्धशतक हुकलंय... मुंबईला चौथा धक्का बसला आहे.

मुंबईला तिसरा धक्का

ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव एकापाठोपाठ एक तंबूत परतले. सूर्यकुमार यादव 13 चेंडूत 26 धावा करुन बाद झाला. तर ईशान किशन 12 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. 

मुंबईला पहिला धक्का

258 धावांचा पाठलाग करताना मुंबईला पहिला धक्का बसलाय. रोहित शर्मा 8 धावा काढून बाद झाला. मुंबई 3.1 षटकानंतर एक बाद 35 धावा

मुंबईपुढे 258 धावांचे आव्हान

DC vs MI : जेक मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीकडून जेक मॅकगर्क यानं 27 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय स्टब्स आणि शाय होप यांनीही झंझावती फलंदाजी केली. मुंबईकडून सर्व गोलंदाज फेल ठरले. मुंबईला विजयासाठी 258 धावांचं आव्हान मिळालं आहे.

दिल्लीला चौथा धक्का

ऋषभ पंतच्या रुपाने दिल्लीला चौथा धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं पंतला बाद केले. 

चावलाचा भेदक मारा -

एकीकडे गोलंदाजांची पिटाई होत असताना पियुष चावलाने भेदक मारा केला. चावलाने 4 षटकात 36 धावा खर्च करत एक विकेट घेतली. पियुष चावलाने जेक मॅकगर्क याला तंबूचा रस्ता दाखवला.

दिल्लीला तिसरा धक्का

शाय होपच्या रुपाने दिल्लीला तिसरा धक्का बसलाय. होपनं 17 चेंडूत 41 धावांची खेळी केली. 13.4 षटकात दिल्ली 3 बाद 180 धावा

दिल्ली 150 पार

12 षटकानंतर दिल्लीने 150 धावांचा पल्ला पार केला आहे. ऋषभ पंत आणि शाय होप मैदानात

दिल्लीला दुसरा धक्का

अभिषेक पोरेलला नबीनं केले बाद.... पोरेलनं 36 धावांची खेळी केली.

दिल्लीला पहिला धक्का

मेकगर्कचा अडथळा चावलानं केला दूर... दिल्ली 7.3 षटकानंतर एक बाद 114 धावा... 27 चेंडूत 84 धावांची केली खेळी.. 

मेकगर्कचं अर्धशतक

फक्त 15 चेंडूमध्ये जेक मेकगर्कनं ठोकलं अर्धशतक.. दिल्लीसाठी दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक... 

दिल्लीचं अर्धशतक

16 चेंडूमध्ये दिल्लीने अर्धशतक फलकावर लावलेय. जेक मेकगर्क यानं 350 च्या स्ट्राईक रेटने केली धुलाई

दिल्लीची वादळी सुरुवात

जॅक मेकग्रानं मुंबईची गोलंदाजी फोडून काढली आहे. जॅकनं 10 चेंडूमध्ये 34 धावांचा पाऊस पाडला आहे. दिल्ली दोन षटकानंतर बिनबाद 37 धावा

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI:

कुमार कुशाग्रा, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार,  लिजाद विलिअम्स

मुंबई इंडियन्सची Playing XI:

मुंबई इंडियन्सची PlayingXI: रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी पीयूष चावला, लूकी वूड जसप्रीत बुमराह,  नुवान तुषारा

मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आज 2 गुण कोणाला मिळणार?

मुंबई इंडियन्सचं ट्विट

दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन सज्ज

सूर्यकुमार यादवचा सराव

पाहा आयपीएलचे Latest Points Table

मुंबई अन् दिल्लीमध्ये चुरस

टीम डेव्हिडची फटकेबाजी

मुंबई इंडियन्सची संभाव्य इलेव्हन Playing XI-

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह. 

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI-

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (सी/कंडित), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे/झाय रिचर्डसन, खलील अहमद, मुकेश कुमार. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश

दिल्लीतील आयपीएलमधील शेवटचा दुपारचा सामना गेल्या वर्षी चेन्नई आणि दिल्लीत झाला होता. आतापर्यंत खेळलेल्या दोन आयपीएल 2024 सामन्यांसह प्रथम फलंदाजी करताना संघांना यश मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ:

रोहित शर्मा, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, क्वेना मफाका

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (w/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, ललित यादव, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, डेव्हिड वॉर्नर, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा, झ्ये रिचर्डसन, रिकी भुई, लिझाद विल्यम्स, इशांत शर्मा, गुलबदिन नायब

पार्श्वभूमी

IPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians: आज दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रंगणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दिल्ली आणि मुंबईसाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.